गावात पक्षीय राजकारण आणू नका आ.औटी यांचे उद्घाटन नियमानुसारच; सचिन चोभे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लोकशाही व्यवस्थेचे काही संकेत असतात. त्यामध्ये राज्य आणि केंद्राच्या योजनांचे भूमिपूजन व उद्घाटने आमदार आणि खासदार करू शकतात. त्यानुसारच आमदार विजयराव औटी हे बाबुर्डी बेंद येथील जलयुक्त शिवार अभियानातील बंधार्यासाठीच्या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव उपस्थित होते. त्यात कोणीही पक्षीय राजकारण आणून गावाच्या विकासाला खिळ बसेल असे कृत्य करू नये असे आवाहन ग्रामस्थ सचिन चोभे यांनी केले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
प्रसिद्धी पत्रकात चोभे यांनी म्हटले आहे की, मागील आठवड्यात सर्व प्रमुख वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या की, आमदार औटी यांनी स्थानिक शिवसैनिकांना हाताशी धरून विकास कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, असा आरोप करणेच चुकीचे असून गावातील विकासाच्या कामांचे उद्घाटन कोण करतो याला विशेष महत्व नाही. कारण गावामध्ये विकास कामे होणे हेच गावाकरी महत्वाचे मानतात. मात्र, ही बातमी प्रसिद्ध झाल्याने गावातील वातावरण कुलुशीत झाल्याने मला हे उत्तर द्यावे लागता आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही योजनांचे उद्घाटन करण्याचा आमदार आणि खासदार यांचा अधिकार आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून आमदार औटी यांना ग्रामस्थांनी उद्घाटनासाठी बोलविले होते. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्यांसह पाणलोट समितीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब चोभे व सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अगदी भाजपचेही स्थानिक कार्यकर्ते यासाठी उपस्थित होते. ग्रामपंचायतीने सदर कामाच्या उद्घाटनाबाबत गावकर्यांनाही दोन दिवस आगोदरच सांगितले होते. माझ्या वैयक्तिक कामामुळे मीही या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला हजार नव्हतो. तशाच पद्धतीने काहींचा हा कार्यक्रम हुकल्याने त्यावर लगेच टीका करणे योग्य नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गावासाठी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प सहा वर्षांपूर्वी मंजूर झालेला आहे. गावामध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामुळे गावासाठी ही योजना मंजूर झाली होती. त्यामुळे याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी गावात दुष्काळ पाडण्याचेही श्रेय घेतल्यास आमची हरकत नाही. आमदार औटी यांच्यासह आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी गावात जलयुक्त शिवार योजनेचा मोठा निधी मिळवून दिला आहे. त्यात कोणा एकट्याचे श्रेय नाही. आमदार औटी यांनी यापूर्वी साखळी बंधारे, खंडोबा मंदिराला सभामंडप, तलावाची दुरुस्ती यासाठी अर्थसाह्य मिळवून दिले आहे. तर, आमदार कर्डिले यांनीही जलसंधारणासह रस्ते, मारुती मंदिरामधील सभामंडप आणि ग्रामपंचायत भवन आदींसाठी निधी दिलेला आहे. 

या दोन्ही लोकप्रतिनिधींनी गावाच्या विकासासाठी आतापर्यंत सहकार्य केले आहे. या दोघांचाही गावाला आदर वाटतो. गावाच्या विकासासाठी माजी सरपंच म्हणून दिलीप चोभे, सुनील खेंगट, उत्तम साळवे, सुभद्राबाई वाळके, रेश्माताई चोभे यांच्यासह सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे मोठे योगदान आहे. यापुढेही गावाच्या विकासासाठी पक्षीय मतभेद विसरून मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य या सर्वच्या मदतीने गावासाठी भरघोस नोधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आरोप-प्रत्यारोप करून गावातील वातावरण गढूळ करण्याऐवजी अशा सकारात्मक कामासाठी आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा वापर करण्याचे आवाहन चोभे यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.