40 दिवसांत संपला 'तिचा' संसार ! ओढणीने गळफास घेऊन नवविवाहितेची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्‍यातील हंडेवाडी येथील कामिनी अमोल घुमरे (वय 21) या नवविवाहितेने बुधवारी घरातील छताला ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यावरून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मयत कामिनी हिचा विवाह 4 डिसेंबर रोजी अमोल घुमरे यांच्याशी झाला. कामिनीचे माहेर नाशिक पंचवटी आहे. पती-पत्नीच्या अंतर्गत वादातून कामिनीने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मयत कामिनीचा नवीन संसार केवळ 40 दिवसांत संपला असल्याने हंडेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मयत कामिनी हिच्या आत्महत्येने दोन्ही नातेवाईकांमध्ये वादविवाद सुरू झाले होते. मात्र, पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी मध्यस्थी करून सर्वांची समजूत काढल्याने वातावरण शांत झाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.