सरपंचांनी विकली दलित वस्तीमधील जुन्या चावडीची सागाची लाकडे !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्‍यातील शेडगाव येथील सरपंचाने अधिकाराचा गैरवापर करून दलित वस्तीमधील जुन्या चावडीची सागाची लाकडे व इतर साहित्य परस्पर विक्री केली आहेत. याबाबत गावातील महेंद्र रणसिंग व अमोल झेंडे यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत अधिक माहिती अशी, शेडगाव येथे दलित वस्तीमध्ये समाजमंदिर चावडी होती. या चावडीचे बांधकाम हे दगड-मातीमध्ये व छतावर पूर्णतः सागवानी लाकूड होते. या चावडीवरील लाकडाचे छत पूर्णतः काढून सरपंच विजय शेंडे यांनी सागवान लाकडाची कोणताही ठराव न घेता अथवा ग्रामस्थांना विचारात न घेता विक्री केली. त्यांनी यामध्ये मोठ्या रकमेचा घोळ केला आहे. त्याचबरोबर चावडीचे बांधकाम पाडून दलित समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

त्यामुळे सरपंच विजय शेंडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महेंद्र रणसिंग व अमोल झेंडे यांनी तक्रार अर्जात केली आहे. या तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक व गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.