मेव्हण्याच्या खूनप्रकरणी आरोपीस १० वर्ष सक्तमजुरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मेव्हण्याच्या खुनप्रकरणी दादा फत्तु शेख (वय वर्षे २२, रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. नगर) यास जिल्हा न्यायाधीश व्हि. जी. मोहिते यांनी दोषी धरून १० वर्षे सक्तमजुरी व ७५ हजार रु. दंडाची शिक्षा ठोठावून त्यातील रक्कम रुपये ७० हजार ही मयताची पत्नी व मुलांना देण्यात यावी व दंड न भरल्यास ३ वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील ॲड. केदार केसकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पो. कॉ. डी. डी. भोसले यांनी मदत केली. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या घटनेची हकिकत अशी की, दि. २४/०९/२०१४ रोजी रात्री ८ वा. चे सुमारास लतिफ ईस्माईल पठाण हा त्यांच्या घरी असताना त्याचा मेहुणा दादा शेख हा मद्यप्राशन करूनत्याची पत्नी जी पठाण याची सख्खी बहिण आहे तिला अर्वाच्च भाषेत मोठमोठ्याने शिवीगाळ करीत होता. म्हणून पठाण हा शेख यास समजावून सांगण्यासाठी गेला व समजावून सांगत असताना आरोपीस त्याबाबत राग आला व त्याने त्याच्या हातातील सुरीने पठाण याच्या डाव्या बाजूच्या बरगडीजवळ भोसकून जखमी केले व शिवीगाळ, दमदाटी करून तेथून पळून गेला.

त्यानंतर पठाण याची आई बेबी पठाण या तेथे आल्या व त्यांनी फोन करून जवळच्या नातेवाईकांना बोलावले. त्यानंतर जखमी लतिफ यास प्रथम कर्जत, नंतर नगर व नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान लतिफ याचा दि. ३/१०/२०१४ रोजी मृत्यू झाला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सदरील मृत्यू हा शेख याने सुरी भोसकल्यानेच झाला. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात शेख याची पत्नी म्हणजेच पठाण याची बहिण दिलशाह शेख, मयताची आई बेबी पठाण, पत्नी रेश्मा पठाण, भावजय शम्मा पठाण यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. तसेच सरकार पक्षातर्फे मयताच्या मृत्यूपूर्वी जबाब नोंदवणारे स. पो. नि. बन्सी बारहाते, मयताची तपासणी करणारे डॉ. सुरेखा गडणकर, डॉ. विजय जाधव यांचा जबाबदेखील घटनेस पुरक असल्याने महत्वपूर्ण ठरला.

याव्यतिरिक्त आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार काढून देतेवेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यातील पंच साक्षीदार प्रमोद घोडके, नरसिंग शेलार, प्राथमिक तपास करणारे पो. कॉ. भाऊसाहेब कुरुंद व गुन्ह्याचा एकूण तपास करणारे पीआय अजीत चितले, पो.नि प्रताप इंगळे यांच्या साक्षीही अतिशय महत्वपूर्ण ठरल्या. सकृतदर्शनी तसेच परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीने गुन्हा केल्याचे न्यायालयापुढे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीस दोषी धरले व ही शिक्षा सुनावली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.