चालकाच्या प्रसंगावधानामुळे गोवा एक्सप्रेसचा होणारा मोठा अपघात टळला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-दौंड रेल्वेमार्गावर घारगाव शिवारात चालकाच्या प्रसंगावधानामुळे गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेसला होणारा मोठा अपघात टळला. काल (दि.11)सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. नव्याने झालेल्या पुलावरील रूळाला तडा गेल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने, त्याने तात्काळ रेल्वे थांबविली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
नगर दौंडमध्ये गेट नंबर 14 वरचा पूल खचला . यामुळे 9 तास रेल्वे सेवा बंद झाली होती. या पुलाचं काम जमिनीखालून करण्यात आलं होतं. काम पूर्ण झाल्यावर इथं पहिली रेल्वे धावली आणि पहिल्याच रेल्वेचं इंजिन पुलावर गेलं आणि हा पूल खचला. पण मोटरमनच्या प्रसंगवधाननं रेल्वे थोडक्यात थांबवण्यात आली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण रेल्वे पुल खचल्यामुळे बराच वेळ रेल्वे सेवा विस्कळीत होती.
रेल्वेमार्ग खचल्यामुळे काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले. तर 5 गाड्या रेल्वे स्थानकांवरच उभ्या करण्यात आल्या होत्या. तब्बल 8 तास रेल्वे सेवा विस्थळीत झाली होती. त्यामुळे प्रवासी यात चांगलेच खोळंबले होते.
रेल्वे काम करुन रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी पहिली गाडी सोडण्यात आली. आणि आता रेल्वे सेवा सुरुळीत चालू आहे. पण या अपघातामुळे प्रवाशांना त्यांच्या गावी पोहचण्याच उशिर झालां.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.