ठाण्यातून पळून आलेले अल्पवयीन जोडपे अहमदनगरमध्ये जेरबंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ठाणे येथून पळून आलेले अल्पवयीन जोडपे श्रीरामपूर तालुक्‍यातील वळदगाव येथून शहर पोलिसांनी जेरबंद केले. छावाचे प्रदेश संघटक ऍड. सुभाष जंगले यांच्या सतर्कतेमुळे शहर पोलिसांना हे जोडपे पकडण्यात यश आले.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
ऍड. जंगले यांचे वळदगाव शिवारात शेत आहे. तेथे त्यांच्या कामगाराच्या घरात अनोळखी मुलगा आणि मुलगी राहत असल्याची माहिती त्यांना शेजाऱ्यांकडून मिळाली होती. त्यांनी चौकशी केली असता कामगाराने ते आपले नातेवाईक असल्याचे सांगून टाळण्याचा प्रयत्न केला. तथापि, ऍड.जंगले यांचा संशय बळावल्याने त्यांनी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अन्सार शेख यांना ही माहिती दिली. शेख यांनी तातडीने बेलापूर पोलिस चौकीचे पथक पाठवून दोघांना ताब्यात घेतले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ताब्यात घेतलेले मुलगा व मुलगी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील असून दोघेई इयत्ता 12 वीतील आहेत. दोघे वेगवेगळ्या धर्माचे असून त्यांच्या पालकांना व भिवंडी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असल्याचे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.