राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे आज श्रीगोंद्यात मेळावा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रवादी कॉंग्रेस नगर-श्रीगोंदा यांच्या वतीने नगर व श्रीगोंदा तालुक्यात पक्षाचा मेळावा शुक्रवार दि. १२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९.०० वा. कुकडी सह. साखर कारखान्यावर आयोजीत केलेला आहे. सदर कार्यक्रमासाठी मा. विधानसभा अध्यक्ष आ. दिलीपराव वळसे पाटील, जेष्ठ नेते मधुकरराव पिचड, आमदार अरुणकाका जगताप, रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, आमदार राहुलदादा जगताप पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रा. तुकाराम दरेकर उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. कोणत्याही शेतीमालाला बाजार नाही, शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमध्ये सर्वत्र गोंधळ आहे, शेतकरी चिंतातूर आहेत. सर्व बाजुंनी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काय करता येईल. यासाठी हा मेळावा आयोजीत केलेला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी सर्व जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन व सदस्य उपस्थित राहणार आहे. तरी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.