विद्यार्थिनीची छेडछाड,शिवीगाळ केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील एका नामांकित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीची छेडछाड करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच जातीयवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी महाविद्यालयीन युवकाविरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत विद्यार्थीनीने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रामा बाचकर (रा. वडनेर, ता. राहुरी, जि. नगर) हा विद्यार्थी गेल्या तीन महिन्यांपासून आपली छेड काढत गैरवर्तन करत असून प्रेम संबंध ठेवण्याची मागणी करत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

त्याने गुरुवार (दि.११) रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या हाताने स्वत:च्या शरीरावर ब्लेडने वार करुन जखमा केल्या व पोलीसात तक्रार करण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना बालीका आश्रम रोडवर घडली असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे हे करत आहेत

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.