निळवंडे कालव्याची कामे पूर्ण न झाल्यास पक्षत्याग : थोरात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारतीय जनता पक्षाला संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्हासह महाराष्ट्रात पुन्हा कमळ फुलवायचे असेल तर निळवंडे प्रकल्पाच्या दोन्हीही कालव्यांची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरु करावे लागेल. त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने संगमनेर आणि अकोलेसाठी सर्वसुविधांयुक्त असलेल्या रुग्णालयाचे बांधकाम करावे लागणार आहे. मात्र या मागण्या येत्या २ ते ३ वर्षांत पूर्ण कराव्यात. अन्यथा आमच्यावर पक्षत्याग करण्याची वेळ येईल, अशी चिंता भाजपाचे माजी अध्यक्ष अॅड. सदाशिवराव थोरात यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यावेळी दादासाहेब गुंजाळ, इंजि. हरिभाऊ चकोर, भीमराज चत्तर, भाजप उपाध्यक्ष पुंजाहरी दिघे, सचिव भरत फटांगरे, बाबूराव खेमनर, आप्पासाहेब आहेर आदींच्या संख्यानिशी निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे, की अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रवरानदीवर बांधण्यात आलेल्या निळवंडे धरणातून निघणाऱ्या उजव्या व डाव्या कालव्याव्दारे जिल्हयातील अकोले, संगमनेर, राहुरी, राहता, श्रीरामपूर, कोपरगाव या सहा तालुके व नाशिक जिल्हयातील सिन्नर असे एकूण सुमारे ६४ हजार २६० हेक्टर ( १,५८,५०० एकर ) क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळतो.

यासाठी माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तत्कालिन सरकारने सन १९७७ मध्ये १५ कोटी ८६ लाख रकमेच्या निळवंडे प्रकल्पाला मान्यता देऊन त्यावेळी काम सुरु करण्यात आले होते. त्यानंतर या धरणाच्या कामासाठी माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री आंणि माजी केंद्रीयमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, कै. विलासराव देशमुख, तत्कालीन भाजपा प्रदेश अध्यक्ष कै. सूर्यभान वहाडणे, माजी उपमुख्यमंत्री कै. गोपीनाथ मुंडे या सर्वांनी वेळोवेळी या प्रकल्पाच्या कामाला गती दिली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

नगर जिल्ह्यात कार्यकर्त्यांची कमतरता असतानादेखील आम्ही गावोगावी फिरून प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा प्रचार केला आहे. विधानससभा निवडणूकीच्यावेळी पक्षाने जनतेला निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्याचे काम चाऱ्यांसह पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. याची आठवण करून देत पक्षाचे माजी अध्यक्ष अॅड. थोरात यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते आणि माजी पदाधिकाऱ्यांनी या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.