चिचोंडी पाटीलमध्ये सरपंच पदासाठी रसीखेच.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सरपंच अर्चना चौधरी यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदासाठी चिचोंडी मोठी रसीखेच सुरू आहे. या ग्रामपंचायतमध्ये पंधरा सदस्य आहे. यामध्ये उपसरपंच शरदभाऊ पवार व अप्पासाहेब पवार यांच्या गटाचे पाच सदस्य व वार्ड क्र. तीनमधील तीन सदस्य अशा आठ ९ ज़णांनी मिळून सरपंचपदी अर्चना चौधरी व उपसरपंचपदी शरदभाऊ पवार यांची निवड केली होती. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सरपंच अर्चना चौधरी यांनी राजीनामा दिल्याने सुधीर भद्रे व अशोक कोकाटे यांच्या गटाकडे तीन व प्रवीण कोकाटे यांच्या गटाकडे चार सदस्य आहेत. भद्रे, अशोक कोकाटे व प्रवीण कोकाटे यांचे मिळून सात सदस्य आहेत. बहुमतासाठी आम्हाला एकच सदस्य कमी असून, तो आम्ही मिळवून सरपंच अमच्याच गटाचा होईल, असे इंजि. प्रवीण कोकाटे म्हणाले.

सरपंच पदासाठी कल्पना ठोंबरे किंवा शारदा ठोंबरे यांच्यापेकी एका सदस्याचे नाव सरपंच पदासाठी निश्चित केले ज़ाईल. कोकाटे गटाकडून ऐनवेळी नगर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष व आमदार राहुलदादा जगताप यांचे समर्थक अशोक कोकाटे यांच्या पत्नीसुद्धा संरपच पदाच्या निवडणूक रिंगणात उतरू शकतात. .
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
उपसरपंच शरदभाऊ पवार म्हणाले,आमच्या गटाकडे आठ सदस्य असून, विरोधी गटातील नाराज सदस्य आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे सरपंच आमच्याच गटाचा होईल, असा दावा केला आहे. सरपंच पदासाठी अंजना पवार व शारदा ठोंबरे यांचे नाव पुढे येत आहे. दोन्ही गटांकडून शारदा ठोंबरे यांचे नाव येत असल्यान सरपंच पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.