उपराष्ट्रपती दौऱ्यात निष्काळजीपणा केल्याने एकावर कारवाई !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :काही दिवसांपूर्वी शिर्डीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भेट दिली होती. त्यावेळी विमानतळावर रुग्णवाहिका पाठवण्यास कसूर केल्याबद्दल साईबाबा हॉस्पिटलचे कंत्राटी कर्मचारी किरण सुंदरबापू तुपे यांच्यावर ठपका ठेऊन त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यात प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यांच्या ताफ्यात साईबाबा हॉस्पिटलची कार्डियाक रुग्णवाहिका देण्याचे ठरले होते; परंतु ९ वाजेनंतर ही रुग्णवाहिका विमानतळावर पोहोचली नाही, याचा ठपका ठेऊन चौकशी विभागात काम करणारे बी.व्ही.जी.चे कर्मचारी किरण तुपे यांना कंपनीने लेखी पत्र पाठवून गैरवर्तन केले म्हणून कामावरून कमी केले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
वैद्यकीय संचालक पी. एम. मुरबीकर यांनी कंपनीला पत्र दिल्यामुळे ही कारवाई झाल्याचे सांगितले जाते. हा कर्मचारी अपंग असून त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, असे असताना आपल्यावर कारवाई झाल्यामुळे कर्मचाऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे. मी कामावर असताना मला वरिष्ठांचा कुठलाही लेखी निरोप आला नाही तसेच याबाबत कळविले नाही. माझी बाजू ऐकून न घेता माझ्यावरील कारवाई हा अन्याय आहे, असे तुपे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.