महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षका विरोधात विनयभंग व ॲट्रोसीटीचा गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :घरकाम करणारी महिला आली नसल्याने तीच्या घरी जाऊन, एका शिक्षकाने विनयभंग केला. या प्रकरणी शिक्षक असलेल्या आरोपी अरविंद उत्तम चव्हाण याच्या विरोधात या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग व ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आरोपी शिक्षक अरविंद उत्तम चव्हाण (वय, ३०, वर्षे.रा.प्रोफेसर कॉलनी,जामखेड) याच्याकडे पीडित महिला ही घरकाम करत होती. सायंकाळी पाच वाजता आरोपी शिक्षक अरविंद उत्तम चव्हाण हा पीडित महीलेच्या घरी आला व माझा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. 

या बाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी शिक्षका विरोधात विनयभंग व ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी रात्री जामखेड पोलिस स्टेशनला भेट देऊन घटनेबाबत माहिती घेतली. 

पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, त्यास आज दि.१० जानेवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्या शिक्षकाची जामिनावर सुटका केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे हे करत आहेत. सदर घटनेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.