शनिशिंगणापूर येथील गणेश भूतकर खून प्रकरण फरार दोघे आरोपी गजाआड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शनिशिंगणापूर येथे गणेश भुतकर खून प्रकरणातील फरारी दोघे आरोपींना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. लखन उर्फ लक्ष्मण नामदेव ढगे (वय 30, रा. शनिशिंगणापूर, नेवासा) व भाऊराव उर्फ दादासाहेब रायभान ढमाले (वय 28, रा. कांगोणी) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहे. आरोपींना गंगापूर (औरंगाबाद) येथे मोठ्या शिताफिने अटक करण्यात आली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक रोहिदास पवार, शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. स. पो. नि. शरद गोर्डे, पो. सई. गुट्टे, पो. हे. कॉ. सोन्याबापू नानेकर, मन्सूर सय्यद, भाऊसाहेब काळे, रविंद्ग कर्डिले, दत्ता गव्हाणे, मनोज गोसावी, विजय ठोंबरे, शंकर चौधरी, विजयकुमार वेठेकर, रवीकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, सचिन आडबल, संभाजी कोतकर यांनी आरोपींना अटक करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

शनिशिंगणापूर येथे गणेश भुतकर यांचा निघृर्ण खून करण्यात आला होता. त्या खून प्रकरणी लक्ष्मण ढगे व भाऊराव ढमाले यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीच्या अटकेसाठी पोलिस शोधात होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.