अशोक मेहेर यांचा जामगावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदाचा राजीनामा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-पारनेर तालुक्यातील जामगाव गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक मेहेर यांनी राजीनामा दिला आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. गेल्या तीन वर्षांपासून जामगाव गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अशोक मेहेर यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली होती. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
गावातील पोलिस ठाण्यात दाखल झालेले तंटे मिटविण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. गावापातळीपासुन औरंगाबाद खंडपिठात सुरू असलेले भांडण साम्यंजस्याने मिटविण्यात अशोक मेहेर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर्वसमावेश काम करुन अनेकांचे गावातील तंटे गावात मिटविण्यात त्यांना यश आले. 

परंतु दुसर्‍यांना संधी मिळावी, या उद्देशाने स्वयंस्फूर्तीने राजीनामा दिला आहे. येत्या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक कार्यक्रमात नवीन तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडण्यात यावा व तंटामुक्त गावाची प्रतिमा अशीच अबादित राहावी, अशी अपेक्षा अध्यक्ष मेहेर यांनी व्यक्त केली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.