जिल्हा बॅंकेच्या नगर कॉलेज परिसरातील शाखेला शार्टसर्किटमुळे आग.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर महाविद्यालयातील एडीसीसी बँकेच्या शाखेला रात्री साडेअकरा ते पाऊणेबारा वाजण्याच्या सुमारास विजेच्या शार्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत बँकेतील अनेक महत्त्वाची कागदपत्रे, इनव्हर्टरच्या बॅटरी, बॅकेचे सर्व्हर या आगीत नष्ट झाल्याची घटना घडली आहे. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर असे की, अहमदनगर शहरातील स्टेशन रोडवरील एका महाविद्यालयात एडीसीसी बॅंकेची शाखा आहे.काल बुधवार दि.१० रोजी रात्री साडेअकरा ते पाऊणेबारा वाजण्याच्या सुमारास बँकेस आग लागल्याचे याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लक्ष्यात आले. त्यानंतर याबाबत महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागास कल्पना दिली.

त्यानंतर अग्निशमनचे सुरेश मिसाळ आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल होत. त्यांनी पाण्याचा प्रचंड मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याबाबत माहिती समजताच कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.कॉ.एम.एम. फकीर.,ठोंबरे,महाविद्यालयातील उपप्राचार्य व रजिस्टार बळीद सर,माणिकराव विधाते, त्याचसोबत अग्निशमन दलाचे कर्मचारी बाळासाहेब घोरपडे, दत्तू शिंदे,अश्पाक शेख,किसन पवार,वैभव वाघ यांनी तात्काळ दाखल होत , आगिवर नियंत्रण मिळवण्यास मदत केली. दरम्यान या घटनेबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.