कृषी सहाय्यक महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर मंगळवारी (दि.३०) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात मालवाहतूक ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दिपाली पोपट शिंदे (वय २५, रा. पानोली, ता. पारनेर) या महिलेचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अपघातातील मयत दिपाली या नगरमधील कृषी विभागाच्या कार्यालयात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत होत्या. त्या कार्यालयाकडे जात असताना हा अपघात झाला. दीपाली यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनचालकाने धडक देवून तो फरार झाला.

या अपघातात दिपाली या गंभीर जखमी होवून मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्या अवस्थेतच त्या रस्त्यावर पडून होत्या. तेव्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूरभाई शेख, महेश महाराज देशपांडे, समीर मन्यार हे या रस्त्यावरून जात असताना त्यांना हा अपघात झाल्याचे समजले. त्यांनी तातडीने दिपाली यांना आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेवून गेले. मात्र दुर्दैवाने दिपाली यांची प्राणज्योत मावळली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दिपाली यांचे माहेर चास असून चास सोसायटीचे व्हाईस चेअरमन विठ्ठल पठारे यांची ती मुलगी होती. दिपाली यांना सहा महिन्यांची मुलगी असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र अवजड वाहनांना बंदी असतानाही मालवाहतूक ट्रक शहरात प्रवेशच कशा करतात असा सवाल उपस्थित केला जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.