नगर तालुक्याची दुष्काळी साडेसाती संपली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शासनाची जलयुक्त शिवार योजना नगर तालुक्याला वरदान ठरत असून तालुक्यातील जवळपास ५९ गावांनी यात सहभाग घेऊन दुष्काळावर मात केली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरु नसल्याने तालुक्याची वाटचाल टँकर मुक्तीकडे सुरु आहे. या योजनेमुळे तालुक्यातील ३५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या नगर तालुक्याने जलयुक्त शिवार योजना एक पर्वणी मानून केलेल्या कामांचे फळ आता पहावयास मिळत आहे. डिसेंबर महिना संपला की तालुक्यात टँकर सुरु करण्याची लगबग प्रत्येक गावात पहावयास मिळत होती, मात्र यंदा तालुक्यातील एकाही गावात अद्याप टँकर सुरु करण्याची वेळ आली नाही किंवा कोणत्या गावाचा यासाठी अजून प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेला नाही. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
१९७२ च्या दुष्काळात तालुक्यात तब्बल २७३ पाझर तलाव बांधण्यात आले. मात्र काळाच्या ओघात हे तलाव गाळाने भरत गेल्याने या तलावांची साठवण क्षमता कमालीची घटत गेली. गावोगावी भूजल पातळी घटत गेली. परिणामी विहिरी व कुपनलिका डिसेंबर संपताच तळ गाठत होत्या. पाणी टंचाईची ही साडेसाती व तीव्र दुष्काळाच्या झळा तालुक्याने वर्षानुवर्षे सहन केल्या. पण जलयुक्त शिवार योजना आता तालुक्याला संजीवनी ठरली आहे.

योजनेत सहभागी गावे - 
निमगाव वाघा, भोयरे खुर्द, गुंडेगाव, पारगाव, भातोडी, हातवळण, वाटेफळ, तांदळी वडगाव, चिचोंडी पाटील, बारदरी, रांजणी, सारोळा बद्धी, जखणगाव, निमगाव घाणा, भोयरे पठार, भोरवाडी, मांजरसुबा, मदडगाव, बाबुर्डी बेंद, खडकी, साकत, दहिगाव, हिवरे झरे,वाळकी, पारगाव मौला, आठवड, कापूरवाडी, अकोळनेर, जाधववाडी, घोसपुरी, सारोळा कासार, पिंपळगाव माळवी, पांगरमल, खोसपुरी, उदरमल, मजले चिंचोली, बहिरवाडी, इमामपूर, धनगरवाडी.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.