भीमा-कोरेगाव; मृत राहुल फटांगडेच्या कुटुंबियांना सरकारची १० लाखांची मदत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुल फटांगडे या तरुणाचा भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी उसळलेल्या दंगलीत मृत्यू झाला होता. मंगळवारी राहुलच्या आईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शासकीय मदतीनुसार १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
१ जानेवारी रोजी शिरूर तालुक्यातील भीमा-कोरेगाव येथे विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी आले होते. यावेळी उसळलेल्या दंगलीच्या वेळी दगडफेकीत राहुल फटांगडे याचा मृत्यू झाला होता. मृत राहुलच्या कुटुंबियांना यावेळी राज्य शासनाच्यावतीने आर्थिक मदत म्हणून १० लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राज्य शासनाच्यावतीने त्यानुसार मंगळवारी मृत राहुल फटांगडेच्या आईला १० लाख रुपयांचा धनादेश बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पठारे उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.