चालकाच्या निष्काळजीपणामुळे स्कूल बसचा अपघात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर येथील अशोक इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसला मंगळवारी सकाळी माळवाडगाव येथे अपघात झाला. बसमधील सर्व 30 विद्यार्थी सुखरूप आहेत.अशोकनगर फाटा येथे अशोक इंग्लिश मीडियम स्कूल आहे. भामाठाण, खानापूर, माळवाडगाव येथील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. परिसरातील 30 विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस (क्र. एमएच 17 – एजी 4948) मुठेवाडगाव कडे निघाली होती. शिकाऊ चालक बस चालवत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून खाली गेली. झाडांमध्ये अडकल्याने बस पलटी झाली नाही. बसमधील एका बाजूचे विद्यार्थी दुसऱ्या बाजूकडील बाकावर पडले. काही विद्यार्थी बाकाखाली फेकले गेले.
याबाबत समजताच परिसरातील ग्रामस्थ व पालकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, पालक मारतील या भीतीने चालक आणि त्याचा सहकारी पसार झाले. शाळेचे प्राचार्य रईस शेख व सहकारी, अशोक कारखान्याचे सुरक्षा अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पालकांनी त्यांना जाब विचारला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत पथवे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. क्रेनने बस काढण्याच्या तयारीत असताना पालकांनी व्यवस्थापन कमिटीच्या मंजूश्री मुरकुटे आल्याशिवाय बस हलवू न देण्याचा पवित्रा घेतला. सिद्धार्थ मुरकुटे यांनी भेट देत पालकांशी चर्चा केली त्यानंतर बस हलविण्यात आली. या प्रकरणी मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे पथवे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.