कोपरगावात बॅंक अधिकाऱ्याचे घर फोडले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अज्ञात चोरट्यांनी शहरातील येवला रोडवरील शारदानगरमध्ये राहणाऱ्या एका बॅंक अधिकाऱ्याचे घर फोडून रोख रकमेसह 96 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शारदानगरमध्ये राहणारे गौतम बॅंकेचे सरव्यवस्थापक बापूसाहेब घेमूड हे रविवारी सहकुटुंब नाशिक येथे मुलीस भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान, घेमूड हे सोमवारी सायंकाळी घरी परतले असता बंगल्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडल्याचे त्यांनी पाहिले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
घरात जाऊन पाहिले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील सामानाची उचकापाचक करून कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने, घड्याळ व 25 हजारांची रोकड असा एकूण 96 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, या प्रकरणी घेमूड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.