जलव्यवस्थापनेचे उत्कृष्ट कार्य,गुंडेगावला जलव्यवस्थापनचा पुरस्कार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मोठ्या दिमाखात पार पडलेल्या सरपंच पुरस्कार सोहळ्यात जलव्यवस्थापनचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नगर तालुक्यातील गुंडेगावचे सरपंच प्रा.संजय कोतकर यांना प्रदान करण्यात आला. जलव्यवस्थापन मध्ये काम करणार्‍या जिल्ह्यातील अनेक गावांतून गुंडेगावची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शासनाच्या आदर्श गाव ग्राम समितीचे पोपटराव पवार, हवामान तज्ञ बी.एन. शिंदे यांच्या हस्ते गुंडेगावच्या वतीने संजय कोतकर, जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, पल्लवी कुताळ यांनी पुरस्कार स्वीकारला. लोकमतच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कार कार्यक्रमात पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या निवड समितीने हा पुरस्कार जाहीर केला.
अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या गुंडेगावात जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2012-13 या कालावधीत जलसंधारणच्या कामास सुरुवात झाली. यावेळी गावातील वयोवृद्धांसह तरूणांना संघटीत करून संरपंच संजय कोतकर, उपसरपंच सुनील भापकर, परसराम धावडे यांच्या समवेत लोकसहभागातून कामास सुरुवात करण्यात आली. 

बाळासाहेबांच्या कल्पकतेला लोकसहभागाची जोड देत प्रयत्नांची पराकाष्ठा करत सरपंच संजय कोतकर व सहकार्‍यांनी जलव्यवस्थापनाचा वेगळा आदर्श राज्यात निर्माण केला. पाणी अडविण्यासाठी नदीवर साखळी पद्धतीने बंधारे बांधण्याच्या कामापासून सुरुवात होऊन पुढे बंधार्‍यांचे खोलीकरण, रुंदीकरण, सीसीटी, डीप सीसीटी चे खोदकाम, तलावातील गाळ काढणे, नाला बंडींग आदी कामे लोकसहभागातून पार पाडली. जनतेने श्रमदान करत तसेच आर्थिक मदतीच्या स्वरूपात आपले योगदान दिले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गावातील नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, जिल्हा परिषद, तसेच कंपन्यांच्या आर्थिक सहकार्यावर गावातील 7 पाझर तलाव व 22 बंधार्‍यांचे खोलीकरण करत शुढळा नदीचा 9 किलोमीटर पर्यंतचा कोंडलेला श्‍वास मोकळा करत वाहून जाणारे करोडो लिटर पाणी गावातच अडवून जिरवले. त्यामुळे ज्या गुंडेगावास उन्हाळ्यात 10-15 टँकरने पाणी पुरवठा होत असे ते गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला.

हाच जलव्यवस्थापनचा गुंडेगाव पॅटर्न महाराष्ट्राला दिशादर्शक ठरला आहे. आज गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. संजय कोतकर यांना मिळालेल्या पुरस्कारात गावातील प्रत्येक नागरिकाचा, बाळासाहेबांच्या कल्पकतेचा व गुंडेगावच्या सर्वागीण विकासास साथ देणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा मोलाचा वाटा आहे. 

या पुरस्कार सोहळ्यास गावातील वामनराव जाधव, सुनील भापकर, नयना भापकर, पूजा मोहिते, मंगेश हराळ, शिवनाथ कोतकर, दशरथ जावळे, ईश्‍वर हराळ, दत्तात्रय कासार, पंडीत हराळ, नाथाभाऊ हराळ, डॉ हनुमंत कुताळ, नंदकुमार माने, नवनाथ येठेकर, सुरेश कुताळ, बाबासाहेब कोतकर, बाळू धावडे, रावसाहेब कोतकर, भवानीप्रसाद चुंबळकर, धन्यकुमार हराळ, उत्तम निकम, प्रदिप भापकर, गोरख कोतकर, अजय मगर आदिंसह ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.