मंत्रीपदाचा वापर सर्वसामान्यांच्या विकासासाठी - प्रा.राम शिंदे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जलसंधारणाच्या प्रभावी कामांमुळे तालुका टॅंकरमुक्त झाला आहे. शेतीसाठीही पाणी मिळत आहे. वीज उपकेंद्रामुळे विजेबाबत आता तालुका स्वयंपूर्ण होत आहे. साकत येथील उपक्रेंद्रामुळे जामखेडचा भार कमी होऊन सर्वांना पूर्णक्षमतेने वीज उपलब्ध होणार आहे.  मंत्रीपदाचा वापर आपण सर्वसामान्यांच्या विकासासाठी करत आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
तालुक्यातील साकत येथे ३३-११ केव्ही वीज़ उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर होते. या वेळी बोलताना ना. शिंदे म्हणाले, तालुक्याच्या विकासासाठी रस्ते, वीज आणि पाणी या पायाभूत गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष दिले आहे.जलसंधारणाच्या प्रभावी कामामुळे तालुका टॅंकरमुक्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी उपलब्ध झाले असून, पाणी पिकांना देण्यासाठी वीज़ही आली आहे. रस्तेही चांगले झाले आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मंत्रीपदाचा वापर आपण सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी करत आहोत. नवीन वीज़ उपकेंद्रासाठी चार कोटी खर्च झाला आहे. या उपकेंद्रातून साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, कडभणवाडी, मोहा, नानेवाडी, हापटेवाडी, रेडेवाडी या आठ गावांतील वीज़पंपधारक, घरगुती व औद्योगिक ग्राहकांना योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे. हे काम आठ महिन्यात पूर्ण केल्यामुळे ठेकेदाराचा सन्मान करण्यात आला. 

या वेळी साकत ते देवदैठण रस्त्याचे काम सुरू करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. या वेळी डॉ. भगवान मुरूमकर म्हणाले, ना. शिंदे यांच्यामुळे तालुक्यात अच्छे दिन आले असून, तालुक्याचा मागासलेपणाा दूर होत आहे. या वीज़ उपकेंद्रासाठी मी आणि सरपंच हणुमंत पाटील यांनी पाठपुरावा केला. ना. शिंदे यांच्या माध्यमातून जलसंधारणाचे प्रभावी काम झाल्याने अनेक गावे पाणीदार झाली आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.