खर्चास पैसे न दिल्याच्या कारणावरून तरुणावर चाकू हल्ला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :खर्चास पैसे न दिल्याच्या कारणावरून एका २० वर्षीय तरुणावर पाच जणांनी चाकूने वार करत बेदम मारहाण केल्याची घटना नवीन मुकुंदनगर परिसरात घडली. या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, निशान अश्पाक शेख यांचे नविन मुकुंदनगर परिसरात मेडिकलचे दुकान असून सोमवारी दि. ८ रोजी ते मेडिकलमध्ये असताना दुपारच्या सुमारास पाच जणांनी मेडिकलसमोर येवून शिवीगाळ करत निशान यास खर्चासाठी पैशांची मागणी केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पैसे न दिल्याने दानिश उर्फ धना (पूर्ण नाव माहित नाही, रा. तांबटकर गल्ली) याने चाकू काढून निशान याच्या डोक्यावर वार केले. यात निशान जखमी झाला असून अरबाज उर्फ माया, अरहज उर्फ डोऱ्या(दोघांचे पूर्ण नाव माहित नाही),खलील कदीर खान (रा.गोविंदपुरा) व साहिल फिरोज शेख यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 
यात निशान याचे साडेतीन हजार रुपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरून नेण्यात आला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स. पो. नि. श्रीमती काळे हे करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.