सरकारने सामाजिक वातावरण बिघडविले माजी मंत्री बाळासाहेब थोरात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सरकार आईच्या भूमिकेत असते. अनेक आंदोलने झाली, तेव्हा नाइलाज म्हणून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी अजूनही सरकार सुधारत नाही. शेतकरी, मजूर, कामगार, बेरोजगार अशा घटकांचे प्रश्न सोडविण्यात सरकारला अपयश आले असून अर्थव्यवस्था कठीण वळणार आहे. त्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करून जनतेला सोबत आणण्याच्या प्रयत्नातून देशात सामाजिक वातावरण बिघडवले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
लातूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना थोरात यांनी भाजपा सरकारच्या काळात राज्यकर्त्यांनी कर्तव्यतत्परता विसरल्याची खंत व्यक्त केली. आपण महसूल, कृषी मंत्री असताना राज्यात सलग तीन वर्षे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोयाबीनवर लष्करी अळी, कापसावर लाल्या पडल्याने शेतकरी अडचणीत असताना तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख लंडन दौऱ्यावर होते. त्यांनी लंडनहून आपल्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे जाहीर करा, असे निर्देश दिले होते. कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण आम्ही करत बसलो नाही, असे सांगून सध्याचे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मानसिकतेचे नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
देशाची शेती अर्थव्यवस्था तर अतिशय कठीण वळणावर आहे, अशी टीका करून नोटाबंदीचा ऑटोबॉईलसह इतर सर्व इंडस्ट्रीमध्ये रोजगारनिर्मिती झाली नाही, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी आ. अमित देशमुख, आ. त्र्यंबकराव भिसे, धीरज देशमुख, ॲड. त्र्यंबकदास झंवर, माजी आमदार वैजनाथ शिंदे, मनपा स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, बाजार समिती सभापती ललितभाई शहा आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.