श्रीगोंद्यातील नराधम आजोबाने केले स्वत:च्या दहा वर्षाच्या मतिमंद नातीवर अत्याचार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील एका नराधम आजोबाने स्वत:च्या दहा वर्षाच्या मतिमंद नातीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आजोबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात एक महिलेचा नवरा खुनाच्या केसमध्ये जेलमध्ये असल्यामुळे तिच्या दोन मुली व एक मुलगा असे सोबत राहतात. तिच्या घरापासून काही अंतरावर या महिलेचा सासरा, सासू व नणंद असे स्वतंत्र राहतात. या महिलेचा मुलगा व मुलगी शाळेत शिकत आहेत तर दुसरी दहा वर्षांची मुलगी ही मतिमंद आहे.

तिला बोलता येत नसल्यामुळे त्या मुलीची सर्व देखभाल ही तिची आईच करते. ती मुलगी शाळेत जाते पण तिला लिहिता-वाचता येत नाही. दि. ८ रोजी सदर महिला ही काही कामानिमित्त सकाळी श्रीगोंद्याला गेली. तसेच मुलगा व दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सदर महिला ही तिचे श्रीगोंद्यातील काम आटोपून सायंकाळी घरी परत आली तेव्हा तिच्या मुलाने तिला सांगितले की त्याच्या आजोबाने त्याच्या मतिमंद बहिणीवर दुपारी अत्याचार केला. या मुलाने ते डोळ्याने पाहिल्यामुळे आजोबाने तू हे कोणाला सांगू नकोस, मी तुला पैसे देतो असे नातवाला सांगितले. परंतु या मुलाने आजोबांचे आमिष नाकारत आपल्या बहिणीसोबत आजोबाने केलेल्या दुष्कृत्याचा भांडाफोड केला. 

त्यामुळे या पीडित मुलीची आई, भाऊ व पीडित मुलगी यांनी काल रात्री श्रीगोंदा पोलिस ठाणे गाठले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात नराधम आजोबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.