जामखेड तालुक्यात महिला-युवती असुरक्षित​​By स्वप्नील खाडे​​ :- आज रोजी जामखेड मध्ये कॉलेजच्या मुलींची व महिला माता भगिनींची भर दिवसा छेडछाड होतीय, जामखेड तालुक्यात काही शाळा कॉलेज बाहेर, शाळे बाहेर बिगर शाळेतील व्यसनी टोळकी उभी रहतात व मुलींची छेडछाड करतात जेव्हा मुली शाळेतून घरी चालल्या असतात तेह्वा अवती भवती च्या टपऱ्या वरून काही जण मुली पाहून विचित्र शिव्या व शिट्या मारतात तर काहीजण मुलींचा रोड ने दुचाकीवर पाठलाग करून छेडछाड करतात.

जामखेड मध्य बाहेर गावाची मुलगी महिला बस स्टँड चौक वा रस्त्यावर उभा असेल तर तिच्या अवती भवती उभा राहून अच्शील भाषा बोलतात व तिची छेड काडतात .आज जामखेड तालुक्यात येवडी गंभीर परिस्थती निर्माण झालीय की ' जर महिला किंवा मुलींना शाळेत वा घरा बाहेर जायचं असेल तर ​जीव मुठीत धरून वागावं लागतंय.

​तालुक्यातील काही ग्रामीण भागात एस टी बसेस ची सोय वेळेवर नाही म्हणून मुलींना चालत जावं लागतं, बस स्थानक, शाळेच्या अवती भवती रोज हा टोळक्यानंचा त्रास मुलींना सहन करावा लागतो, ही बाब व त्रास जर घरी आई-वडिलांना सांगितला तर घरचे आपली शाळा बंद करतील ह्या भीतीने मुली घरी वा कोणाला ही हा त्रास सांगत नाहीत​.

​आपण रोज छेडछाड करूंन पण मुलगी काही प्रतिकार देत नाही ह्याचाच गैर फायदा घेऊंन हे टवाळखोरं कोपर्डी सारखे नराधम तयार होतात ..​ जामखेड तालुक्यात ग्रामीण भागात कुठे एखाद्या गरीब महिलेचा विनयभंग झाला जर ती महिला पोलिसांत गेली तर हे पुढारी नेते गुन्हेगार त्यांचा कार्यकर्ता असल्यानं त्यांच्यावरही आणून त्या महिलेवर अजून अन्याय करतात.तिची दखल कोणच घेत नाही ..

अश्या पद्दतीने तालुक्यात अनेक अबला व गरीब जनतेवर अन्याय होतो ,​विना परवान्याच्या मोठ्या आवाजाच्या सायलन्सर लावलेल्या टूव्हिलर गाड्या त्यानी होणार दिवसेंदिवस ध्वनी प्रदूषण , गर्दी च्या ठिकाणी मेन पेठ रोड वर एकदंम वेगाने ह्या काही टवाळखोरांच्या गाड्या भर पब्लिक मध्य धावतात , त्यामूळ अनेक लहान मुले जेष्ठ नागरिक महिला यांना धक्का लागून जखम होते लोकांना खूप त्रास होतोय पण हे टवाळखोर कोण्या पुढार्याचे कार्यकर्ते युवा नेते झालेले असतात , ह्या दहशती मुळे लोकांना गप्प बसावं लागतं. ही वाढती दादागिरी समजाचा समतोल मोड्न्याला कारणीभूत ठरत आहे. 

हेच राजकारणी निवडणुकांच्या काळात दिवसा आपल्या आई-वडिलांच्या पाया पडतात मत मागतात ' व त्याच रात्री तुमच्या तरुण मुलाला भावाला, नवऱ्याला, वडिलाला दारू पाजून व्यसनी करूंन तुमच जीवन बरबाद करतात.हेच काही तथाकथीत नेते आजचे गुंड झालेत तरुनाईला लयाला लावायच काम हे लोक करत आहेत.

ज्या वयात शिक्षण घेऊंन नौकरी करण्याची वेळ असते त्या वयात तूमचा मुलगा कुठं एखाद्या पक्षाचा युवा नेता , भैया, अध्यक्ष होतो, वेळ निघून गेली की शेवटी त्याला पश्चाताप येतो आणि त्याला वेगळ्या वळणावर लावायला गुंड प्रवृत्तेचे नालायक मंडळी उपलब्ध समाजव्यवस्थेत असतातच.

आज प्रधानमंत्री मोदीचे यांचे स्वप्न 'स्वच्छ भारत' असलेल्या देशात जामखेड तालुक्यात मुख्य बाजारपेठ व काही शहरात गावात महिलांना सार्वजनिक शौचालय नाही. अहमदनगर सह राज्यात नावलौकिक असलेला जामखेड तालुक्याला इतिहासाचा वारसा आहे राज्यशासनाच दरबारी खात ह्या तालुक्याला आहे तरी इथे समाजाचा समतोल व लोकशाहीचा कणा दादागिरी ' गुंडागर्दी ' व महिलाविनयभंगान मोडतोय ही अतिशय दुर्दैवी बाब आहे हे ह्या लोकप्रतिनिधी समजायला हव ..

स्वप्नील खाडे​​

​ता .जामखेड जि .अहमदनगर​

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.