शिपाई झाला बांधकाम समितीचा सभापती !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव नगरपालिकेच्या बांधकाम खात्यात २१ वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करणारे विद्यमान नगरसेवक जनार्दन कदम हे त्याच खात्याचे सभापती झाले आहेत. कदम यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शहराच्या निवारा प्रभाग क्रमांकमध्ये राहणारे कदम बारावीत शिकताना तत्कालीन नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या १९९६ साली कारकिर्दीत अवघ्या ७०० रूपये प्रतिमाह मानधनावर हंगामी शिपाई म्हणून रूजु झाले. एका वर्षात त्यांची नोकरी गेली.

पुढे सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालयात बी.ए.ची घेतली. समता पतसंस्थेत शिपाई झालेले कदम हे पुढे लिपीक, वसुली अधिकारी व आता विशेष वसुली अधिकारी झाले. २१ वर्षाच्या ध्येयाधिष्टीत प्रवासात कदम यांचा जनसंपर्क वाढला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

नगरपालिका निवडणुकीत साई संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे व कोयटे यांच्यामुळे ते भाजपाचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नुकतीच त्यांची बांधकाम समिती सभापतीपदी वर्णी लागली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.