खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुकुंदनगर येथील मोकळ्या भुखंडावरील टपरी काढून घेण्यासाठी ५ लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली असून खंडणी न दिल्यास कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शकील कादर सय्यद (रा. सुर्यानगर, तपोवन रोड, सावेडी) यांचा मुकुंदनगर परिसरात मोकळा प्लॉट असून या प्लॉटवर इम्रान शेख याने एक टपरी टाकली आहे. ही टपरी काढून घेण्यासाठी सय्यद यांनी शेख याला सांगितले. मात्र यातून दोघांमध्ये वाद झाले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शेख याने सय्यद यांच्या चारचाकी गाडीला दोन साथीदारांसह दुचाकी आडवी घालत टपरी काढून घेण्यासाठी सय्यद यांना ५ लाखांची खंडणी मागितली व ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात इम्रान शेखसह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई नयन पाटील हे करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.