तरूणास कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाच्या डोके व मनगटावर धारधार लोखंडी कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शहरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गांधीनगरमधील झेंडागल्लीत राहणारा अमोल किशोर मंजुळ (वय २८) हा सोमवारी रात्री चुलत भावाच्या मुलीच्या हळदी समारंभात नाचत होता. ११ वाजण्याच्या सुमारास गणेश मारुती गायकवाड यांनी मागील भांडणाच्या कारणावरून अमोल याच्या डोके व मनगटावर लोखंडी कोयत्याने सपासप वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यास उपचारार्थ तातडीने शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी अमोल याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गणेश गायकवाड यांच्याविरूध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.आर. थोरात हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.