न्यू आर्टस् महाविद्यालयात 'जीएस' निवडीवरून 'राडा'

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी प्रतिनिधी पदाच्या निवडणुकीच्या कारणावरुन न्यू आर्टस् महाविद्यालयात शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचे चित्र पहावयास मिळाले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याने कॉलेजच्या वर्तुळात दिवसभर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. संध्याकाळी परिस्थिती पूर्ववत झाली. दरम्यान, याप्रकरणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ, धक्काबुक्की व विनयभंग झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये शिवसेनेच्या दोन नगरसेवकांविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, न्यू आर्टस महाविद्यालयात गुरूवार दि. ४ रोजी सकाळी विद्यापाीठ प्रतिनिधी निवडीवरून सेना-राष्ट्रवादी समर्थकांमध्ये वादंग झाला. महाविद्यालय परिसरात निवडणूकीच्या निकालासाठी मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्यात हा प्रकार घडल्यामुळे वातावरण चांगलेच तणावाचे बनले होते. या घटनेची माहिती मिळताच दोन्ही बाजूच्या समर्थकांनी व नेत्यांनी महाविद्यालयीन परिसरात धाव घेतली. दोन्ही गटात वादावादी होवून झटापट झाली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुरेश सपकाळे घटनास्थळी फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी महाविद्यालय परिसरात जमा झालेला जमाव पांगविला. दरम्यान याप्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी प्रतिनिधी पदाकरिता झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. 

या कारणावरुन वैभव ढाकणे, अमोल खाडे, सुहास शिरसाट, सुरज जाधव, रामा वाघ, वैभव वाघ, अंकुश चत्तर, संतोष लांडे, गजानन भांडवलकर व अनोळखी व्यक्तीने वाद घालून शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच विनयभंग केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर दुसऱ्या घटनेत, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याने विद्यापीठ प्रतिनिधी निवडीवरून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वाद घालत विनयभंग केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी विक्रम राठोड, योगीराज गाडे, दिपक कांबळे, शुभम बेंदे्र, प्रकाश नरसाळे, वृषभ भंडारी, दिपक भोसले, आढाव यांच्यासह अनोळखी व्यक्तींविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास पो.नि.सपकाळे हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.