निवडणुकांपुर्वी जिल्हा विभाजन होणार - पालकमंत्री प्रा.राम शिंदे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. जिल्हयाच्या विविध खात्याच्या प्रमुखांना व अधिका-यांना एवढया मोठया जिल्हयात जाणं, सेवा देण जिकरीच काम होते. जनभावनेनुसार जिल्हयाचे विभाजन होऊन दोन जिल्हे झाले पाहिजेत. त्यादृष्टीने  राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी याबाबत निर्णय होईल, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री राम शिंदे यांनी आज (दि. 28) केले.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कोकमठाण येथे जंगलीदास महाराज आश्रमात महावितरण अभियंता संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते.
ना. शिंदे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करताना  पूर्वी जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर असावे की, संगमनेर यावरुन वाद होत होते. तेव्हाच्या सरकारमधील लोकांमध्ये समन्वय नसल्याने हा वाद होत होता.  आता सरकार बदलेले आहे. त्यामुळे हेडक्वाॅर्टरच्या संदर्भात योग्य तो निर्णय राज्य सरकार घेईल.

अहमदनगर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या अतिशय मोठा असल्याने कामाचा ताण वाढतो. त्यावर जिल्हा विभाजन हा महत्वाचा पर्याय असून, त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. येत्या विधानसभा निवडणूकांपुर्वी जिल्हा विभाजनाची घोषणा होऊन नवीन जिल्हे अस्तित्वात येतील, असेही  त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, संचालक गणपत मुंडे, सतीश कर्पे, असोसिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर, उपाद्यक्ष संजय पाटील, सचिव विजय राणे, प्रताप शेळके आदी उपस्थित होते.

लांडगा आला रे आला...
सुमारे 35-40 वर्षांपासून जिल्हा विभाजनाची मागणी होत आहे. अनेकदा नेत्यांनी जिल्हा विभाजनाची घोषणा झाली. चर्चा घडून आला. विभाजनावर बोलल्यावर प्रसिद्धी मिळते, म्हणून अनेकांने त्यावर चर्चा घडून आणली. परंतु, प्रत्यक्षात विभाजन कधी झालेच नाही. पालकमंत्री शिंदे यांनी केलेली घोषणा ही नवीन नाही. जिल्हा विभाजनावर शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून 'लांडगा आला रे आला' या कथेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.