पथदिव्यांच्या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा हात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महापालिकेत उघडकीस आलेल्या ४० लाखांच्या पथदिवे घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने गुरुवारी (दि.४) दुपारी पत्रकार परिषदेत करण्यात आला. ठेकेदार सचिन लोटके हा राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असून, त्याने या कामांसह अन्य कामेही बोगस केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याने केलेल्या सर्वच कामांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे हा गैरव्यवहार थेट ४-५ कोटीपर्यंत जावू शकतो. अशी शक्यता शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी व्यक्त केली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पथदिवे घोटाळयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेवून शिवसेना पदाधिकारी, नगरसेवकांनी या संदर्भात भूमिका मांडली.यावेळी अनिल राठोड यांच्यासह शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर सुरेखा कदम, सभागृहनेते गणेश कवडे, गटनेते संजय शेंडगे, संभाजी कदम, सचिन जाधव, अनिल शिंदे, दत्ता जाधव, दिगंबर ढवण, अनिल बोरुडे, दीपाली बारस्कर, भगवान फुलसौंदर, प्रतिभा भांगरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अनिल राठोड म्हणाले की, राष्ट्रवादीकडून विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून, ही जनतेच्या पैशांची लूट आहे. जेथे गरज नाही, तेथे पथदिवे लावण्यात आलेले आहेत. पथदिव्यांचे सर्व दिवे कमी दर्जाचे, चायना मेड आहेत. सहा महिन्यांपूर्वी लावलेले दिवेही बंद पडत आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
हा भ्रष्टाचारही उघडकीस आणणार आहोत. पथदिवे घोटाळा दडपण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु आहेत. ठेकेदारही राष्ट्रवादी कार्यकर्ता त्यामुळे त्यांच्याकडून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. मात्र या प्रश्नावर शिवसेना गप्प बसणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून कारवाईची मागणी करणार आहोत. राष्ट्रवादीने जनतेचा खाल्लेला पैसा त्यांच्या घशातून काढून घेवू, असेही राठोड म्हणाले.

महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, सचिन लोटके हा राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीने केलेल्या मटकाफोड आंदोलनात व त्यापूर्वीच्या आंदोलनांमध्येही तो होता. त्यामुळेच आ.जगताप यांना त्यांची कळवळ असून, ते अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत.

नगरसेवक सचिन जाधव म्हणाले, आ.जगताप यांनी दिलेल्या पत्रात आरोपी ठेकेदार असा शब्दप्रयोग केल्यामुळे त्यांनाही हे मान्य आहे. मग चौकशीची गरज काय? थेट गुन्हा दाखल व्हायला हवा होता. सदर बोगस बिले काढण्यासाठी उपायुक्तांसह अधिकाऱ्यांना कोणी फोन केले. याची माहिती आम्ही मागवणार असून, महापालिकेतील सीसीटिव्ही फुटेजचीही मागणी करणार आहोत.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.