...मोनिकाताई आता रडू नका तर लढा : ना. मुंडे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-"कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. आज बाहेर पडण्यास माझे पाय लटपटत आहेत. पण राजीव राजळे गेले हे सत्य स्विकारायला मन तयार होत नाही. त्यांचा आधार असल्यानेच मी कामे करीत होते. आता आधारच गेल्याचे शल्य मनात आहे",असे भावनिक उदगार आमदार मोनिका राजळे यांनी काढताच उपस्थितांना आश्रू आवरता आले नाही.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------

स्व. प्रमोद महाजन यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पूनम महाजन यांना दु:खातून सावरण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यावेळी गोपीनाथ मुंडेसुद्धा खुपच भावूक झाले होते. आज आ. मोनिका राजळे यांनादेखील स्व.राजीव राजळेंच्या दु:खातून बाहेर काढण्यासाठी मी येथे आले आहे. राजळे कुटुंबाची जबाबदारी काही काळासाठी मी घेत असून, आता रडायचे नाही तर लढायचे, असे भावनिक आवाहन राज्याच्या ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केले.

कासार पिंपळगाव येथील सिद्धसावली (झोपडी) येथे मंगळवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, आमदार बाळासाहेब मुरुकुटे यांनी आमदार मोनिका राजळे यांची भेट घेतली. स्व.राजीव राजळे यांच्या निधनाला तीन महिने झाले तरी त्या दु:खातून आ. राजळे अजूनही सावरल्या नाहीत. त्यांनी बाहेर पडावे व मतदारसंघात सक्रिय व्हावे, यासाठी शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातील कार्यकर्ते व राजळे कुंटुबावर प्रेम करणारे ज्येष्ठ मंडळी प्रयत्न करीत होते. 

भाजपाच्या काही प्रमुख मंडळींनी मुंडे यांची परळी येथे जाऊन चार दिवसांपूर्वी भेट घेतली होती. ना.मुंडे यांनी येऊन आ.राजळेंना सार्वजनिक जीवनात सक्रिय करावे, असा आग्रह धरला होता. मंगळवारी मुंडे कासार पिंपळगाव येथे आल्या होत्या. या वेळी आमदार राजळे, विजय गोल्हार, अक्षय कर्डिले, राहुल राजळे, रामकिसन काकडे, उद्धव वाघ, डॉ. मृत्युंजय गर्जे, सोमनाथ खेडकर, विष्णुपंत अकोलकर, पुरुषोत्तम आठरे, अरुण मुंडे, दिनकर गर्जे, माणिक खेडकर, सुभाष ताठे, राहल गवळी, सुनील ओव्हळ, सुनील परदेशी, मंगल कोकाटे, काशिबाई गोल्हार, सिंधुबाई साठे, संदीप पठाडे, वैभव खलाटे उपस्थित होते. 

या वेळी बोलताना मुंडे म्हणाल्या, दु:खाचे प्रसंग सर्वांच्याच जीवनात येत असतात. निसर्गाने व संस्कृतीने यावर मात करण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे. स्व. गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा मलाही आकाश कोसळयाची जाणीव झाली होती. मात्र, आपण लाखांचे पोशिंदे आहोत, यामधून बाहेर पडून जनतेने जे प्रेम आपल्यावर केले, त्याची उतराई होणे आपले कर्तव्यच आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना आम्ही महिला आमदार एकत्रीत बसलो होतो, तेव्हा मोनिका राजळेंना आता बाहेर पडण्यासाठी आग्रह केला पाहिजे, असे ठरले आणि मग त्यासाठी मी आज येथे आले. 

दु:खात कधी कधी आपल्यालात आईची आई होण्याची वेळ येते, तिला धीर द्यावा लागतो. मोनिका राजळे माझ्या बहीण असल्या तरी मी त्यांना मैत्रीण म्हणून जास्त जीव लावते. कोणतीही योजना आली की, परळीसाठी ती राबविताना ती पाथर्डीसाठी देण्याचे विचार माझ्या मनात येतात. गोपीनाथ मुंडे यांनी पाथर्डीला मावशी मानले आणि पाथर्डीकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. राजीव राजळेंना समोर ठेवूनच काम करायचे आहे. लोकांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत, त्यांच्या सुख-दु:खात जाऊन आपलं दु:ख हलकं करावे लागेल. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.