नेवासा ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी दीड कोटीच्या प्रस्तावास मान्यता.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवाशाच्या ग्रामीण रुग्णालयाची गेल्या पाच वर्षापासून झालेली दुरवस्था सुधारण्यासाठी आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रयत्नाने रुग्णालय परिसर व निवासस्थान दुरुस्तीच्या कामासाठी १ कोटी ५८ लाख ३२ हजार रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेबाबत अनेक तक्रारी होत्या. रुग्णालय परिसर व वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने यांची रुग्णालयाच्या उद्घाटनापासून दुरुस्त अथवा डागडूजी केलेली नव्हती. परिणामी याठिकाणी निवासस्थानांमध्ये कोणताही वैद्यकीय अधिकारी गेल्या अनेक वर्षापासून राहत नव्हते.

जे कर्मचारी अथवा वैद्यकीय अधिकारी तात्पुरत्या स्वरुपात रहात होते त्यांनाही अनेक संकटांचा सामना करावा लागत असे. पावसाळ्यात तर ही निवासस्थाने राहण्यायोग्यच राहिलेली नव्हती. निवासस्थानामधील शौचालये हा मोठा गंभीर विषय झाला होता. याशिवाय ग्रामीण रुग्णालय देखील परिसर स्वच्छतेअभावी नेहमीच टीकेचा विषय झालेला होता.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नागरिक व अधिकाऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी ग्रामीण रुग्णालयाची संपूर्ण माहिती घेऊन दुरुस्तीचा आराखडा तयार करून घेतला व १ कोटी ९२ लाख रक्कमेचे अंदाज पत्रक सादर केले होते. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य सेवा संचालयाने या आराखड्याबाबत अहवाल मंर्त्यांकडे पाठवला. 

आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी सदर आराखड्यास मंजुरी दिली. त्यानुसार १ कोटी ५८ लाख ३२ हजार एवढ्या रक्कमेच्या अंदाज पत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदरचे काम ताबडतोब सुरु करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचेही आ.बाळसाहेब मुरकुटे यांनी सांगितले.

नेवाशाचे ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे असून या रुग्णालयावर नगर-औरंगाबाद महामार्गावरील अपघातांचा तसेच परिसरातील २२ गावांचा देखील भार आहे. तालुक्यातील रुग्ण सेवेची सर्व शिबिरे याच ठिकाणी घेतली जातात. त्यामुळे या दुरुस्तीनंतर पुन्हा एकदा रुग्णालय आरोग्य सेवेसाठी सज्ज होईल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.