ब्लॉग - अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमांतून गडाखांची 'राजकीय' बांधणी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त यशवंत प्रतिष्ठानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमातून प्रशांत गडाख व माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राजकीय बांधणी केली आहे. माजी आमदार गडाख सध्या राष्ट्रवादी पासून अलिप्त झालेले आहेत त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून स्वतःच्या हिमतीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नेवासा नगरपंचायतची निवडणूक लढविली आणि त्यामध्ये त्यांना घवघवीत यशही मिळाले, परंतु गडाखांना विधानसभेसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गडाख यांना शह देण्याच्या हेतून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी मोर्चेबांधणी केलेली आहे. माजी आमदार पांडुरंग अभंग यांचा अमृतमहोत्सव सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला, गडाख यांना शह देण्यासाठी माजी आमदार अभंग यांनाही आगामी काळात पुढे आणले जाऊ शकते, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचाही राष्ट्रवादीकडे पर्याय आहे. गडाख यांनी राष्ट्रवादी सोडली असली तरी त्यांनी स्थानिक नेत्यांवर टीका केलेली आहे, पक्षावर टीका केलेली नाही.

त्यामुळे गडाख अजून पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात येऊ शकतात, अशी शक्यता आहे। त्यांच्याकडून अजूनही कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.परंतु ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम भूतो ना भविष्य असा केलेला आहे. या कार्यक्रमाला फक्त नेवासा तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकार्यासह नागरिकांनी हजेरी लावली होती.

पाच दिवसीय प्रदर्शनात राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा आदी पक्षांच्या नेत्यांनीही भेट देऊन गडाख यांच्या नियोजनाचे कौतुक केले, विशेष म्हणजे यशवंतराव गडाख यांचा सन्मानही अनेक नेत्यांनी केलेला आहे. यशवंतराव गडाख यांनी भरविलेल्या साहित्य संमेलनासारखेच या प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आलेले होते. विशेष म्हणजे हे नियोजन मुळा एज्युकेशन संस्थेचे प्रशांत गडाख यांनी केलेले आहे त्यामुळे दक्षिण लोकसभा मतदार संघातून गडाख उभे राहण्याची शक्यता या प्रदर्शनामुळे व्यक्त होऊ लागलेली आहे. सिनेटच्या निवडणुकीतून गडाख यांनी यावेळी उमेदवारी केलेली नाही. त्यावरून त्यांनी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच हे सर्व केले असल्याची चर्चा सध्या राजकीय धुरानींमधून व्यक्त होत आहे.

प्रशांत गडाख व शंकरराव गडाख यांनी ज्या पध्दतीने सोनईमध्ये कार्यक्रम घेतलेले आहेत ते कार्यक्रम म्हणजे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचे संकेत आहे दुरावलेल्या लोकांना त्यांनी एकत्र आणले, या कार्यक्रमांमुळे गडाख यांचे तालुक्यासह जिल्ह्यात चांगले वर्चस्व निर्माण झालेले असून त्यांची ताकद वाढलेली आहे. याची धास्ती मात्र विरोधकांनी घेतलेली आहे, त्यांच्याकडूनही गडाख यांच्या कार्यक्रमांना शह देण्यासाठी नियोजन करण्याचे प्रयत्न सुरु आहे. परंतु त्यात त्यांना कितपत यश येते हे आगामी काळात स्पष्ट होइल.

काँग्रेसच्या गोटातून दक्षिण मतदार संघातून डॉ.सुजय विखे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, राष्ट्रवादीकडे सध्या तरी उमेदवार लोकसभेसाठी नाही परंतु प्रशांत गडाख यांचाही पर्याय राष्ट्रवादी दक्षिणेसाठी होऊ शकतो, गडाख यांच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रम हा त्याचाच एक भाग असण्याची शक्यता आहे या कार्यक्रमाला दक्षिणेतील शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांबरोबरच नेत्यांची रिघ ही आगामी मोर्चे बांधणी असल्याचे संकेत आहेत.

राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या लोकसभेसाठी आघाडी झाली नाही तर डॉ. सुजय विखे व प्रशांत गडाख यांची चांगलीच लढत होऊ शकते. स्व. ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे व यशवंतराव गडाख यांच्या लढतीसारखीच ही लढत होऊ शकते. गडाख व विखे कुटुंबातील लढत चुरशीची होणार होऊ शकते हे मात्र नक्की !

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.