माणूसपण जपणारा नेता : स्व. गोविंदराव आदिक

'युं तो जिनके लिए जिते है सभी, क्योंकी मरते नही, लेकीन मरकर भी जिते है कोई कोई, वह इन्सान गोविंदरावजी आदिक है'. माझा व गोविंदरावांचा संबंध तसा १९६५ पासून होता. नंतर आमदारकीच्या निवडणुकीने व कारखान्याच्या निवडणुकीने संबंध जवळचे आले. समाजासाठी रात्रंदिवस झटून अनेक लोकोपयोगी कामे केली. टाकळीभान टेलटॅँकमुळे गोविंदसागर नावाने वाडगाव पाझर तलाव, खोकर, खानापूर, रस्ता रिमांड होम, एम.आय.डी.सी.साठी मदत अशी अनेक समाजोपयोगी कामे केली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
त्या दरम्यान ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, अशोक एज्युकेशन, अशोक पब्लीक स्कूल निर्माण करताना मला अशोक एज्युकेशन उपाध्यक्षपद देऊन १०-१२ वर्षांपर्यंत काम करण्याची संधी दिली. त्या संस्थेमार्फत १२ हायस्कूल, ५ कॉलेज चालवतो. त्यात रेसिडेंशीयल ११०० मुले आहेत. स्व.आदिक हे इंटक महाराष्ट्राचे अध्यक्षही होते. समाजसेवा मंडळ स्थापन करून सामान्य जनांची सेवा केली. ग्रामीण विकास प्रतिष्ठाणतर्फे शेतकऱ्यांना चांगले बियाणे मिळावे व शेतीबद्दल माहिती मिळावी म्हणून छोटे विद्यापीठ स्थापनेचे त्यांचे स्वप्न होते, पण राजकीय खेळी योग्य न झाल्याने सर्व योजना पुढे बाद झाल्या.

माझ्या जीवनातील फक्त २ प्रसंग सांगू इच्छितो, मला कोपरगावची पॉवर हाऊस घेणे होते. तेच कै. लक्ष्मणराव आदिक यांना घेण्यासाठी ते गेले. साहेबांनी सांगितले सौदा ५ हजारांनी झाला नाही, त्याच दिवशी मी गोविंदरावांना विचारले की, पावर हाऊस मला घ्यावयाची इच्छा आहे. भावास न सांगता मला सांगितले. त्वरीत जा सौदा करा व सांगा बाकी सर्व मी करेन. मी जाऊन सौदा केला, त्यांनी मला आर्थिक व्यवहाराची मदत केली, केवढे मोठे प्रेम! 

माझी व त्यांची जमीन शेजारी होती. त्यांचे माझे जमिनीत गहू, त्यांचे खळे २/३ दिवस आम्ही रोज जाऊन ४५०/५०० पोते तयार केला. माझे खळे करण्यास गोविंदराव व मी गेलो. खळे सुरू होणार तोच मला ताप, थंडी आली. माझे १००/१२० गहू तयार स्वत: पोते शिवून तयार करून घेतला. मला उठूनही दिले नाही. सकाळी घरी श्रीरामपूरला आणून डॉक्टरांना दाखवून मग ते घरी गेले. जीवनात असा मित्र होणे नाही - स्वरुपचंद कोठारी.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.