अहमदनगर लाईव्ह ब्लॉग - उड्डाणपुलाची उदंड उड्डाणे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर शहरात उड्डाण पूल व्हावा, यासाठी उदंड आंदोलने झालेली आहे. परंतु उड्डाणपुलाच्या कामाचा श्रीगणेशाय प्रत्यक्षात अजूनपर्यंत झालेला नाही. यावरून राजकीय फटकेबाजी जोरात होत असली तरी हा प्रश्‍न निकाली काढण्यात सत्ताधार्‍यांना अपयश आलेले आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या सरकार व सध्याचे भाजप-सेनेचे सरकार या दोन्ही सरकारच्या कार्यकाळात हा प्रश्‍न अजूनही काही सुटलेला नाही. हा प्रश्‍न सोडविण्यात येईल, असे प्रत्येक वेळी आश्‍वासने दिली जातात. मात्र प्रत्यक्षात हा प्रश्‍न सोडविला जात नाही. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
हा प्रश्‍न सोडवायचा नाही असेच आता नगरकरांना वाटत आहे. याच प्रश्‍नावरून मात्र शहरातील राजकारण नेहमीच ताप आहे. राजकारणात मात्र निरापराधांना आपला जीव गमावावा लागत आहे. शहरातील उड्डाण पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, कामास त्वरीत सुरुवात होईल, असे आतापर्यंतच्या तीन पालकमंत्र्यांनी आश्‍वासने दिली. या कामाचे अनेकदा भूमिपूजनही झालेले आहे. मात्र प्रत्यक्षात कामास सुरुवात झालेली नाही. फक्त श्रेय लाटण्यासाठीच काहींनी उड्डाणपुलांच्या कामांचे भूमिपूजन केलेले आहे. 

प्रत्यक्षात पूल अस्तित्वात आलेला नाही. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनीही आपण जिल्ह्यातून बदली होऊन जाताना शहरातील उड्डाणपूलावरूनच जाऊ, असे जाहीर व्यक्तव्य केले होते. मात्र त्यांच्या कार्यकाळातही शहरातील उड्डाणपुलाचे काम प्रत्यक्षात सुरु झालेले नाही. उड्डाणपूलावरून जाण्याचे त्यांचे स्वप्न तसेच अधुरे राहिले. शहरातील उड्डाणपुलाचा मुद्दा शहरातील जनतेचा आता चेष्टचा विषय बनलेला आहे. त्यावर फक्त टीकाटिपन्नी केली जात आहे. प्रत्यक्षात हा पूल अस्तित्वात येईल, की नाही, याची खात्री आता जनतेला नाही.त्यामुळे नगरकर आता या विषयावर बोलणे ही टाळत आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राजकीय उदासीनतेमुळेच शहरातील विकासाचे मुद्दे तसेच प्रलंबित राहत आहे. विकासकामांमध्ये राजकारण घुसत असल्यामुळे शहरातील अनेक प्रश्‍न तसेच खिदपत पडून आहेत. शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न मोठा आहे.या वाहतुकीने शहरात अनेकांचे बळी घेतलेले आहे. अशा घटना घडल्यानंतर उड्डाणपुलाचा मुद्दा ऐरणीवर येत असतो. घटना घडून गेली की दोन-तीन दिवसात पुन्हा हा मुद्दा अडगळीला पडत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत रहावी,असे वाटत असेल तर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करणे गरजेचे आहे. नाही तर हा प्रश्‍न सुटणार नाही, त्याचे राजकारण झाल्याशिवाय राहणार नाही. 

यात निरपराधांचे बळी मात्र जात राहणार आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी उड्डाणपुलाच्या श्रीफळ वाढविणार दुसर्‍या दिवशी कामाला सुरुवात करणार असे वक्तव्य नुकतेच केले. या अगोदरच्या पालकमंत्र्यांनी सुध्दा हेच वक्तव्य केलेले आहे. प्रत्यक्षात काम काही सुरु झालेले नाही. विशेष म्हणजे ना. शिंदेच्या अगोदरच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन झालेले आहे. त्यामुळे ना. शिंदे यांनी केलेले उड्डाणपुलावरील वक्तव्य नगरकर गांभिर्याने घेतील, असे वाटत नाही. 

लांडगा आला रे लांडगा आला अशी गत नगरच्या उड्डाणपुलाच्या कामाची झालेली आहे. जनता अनेकदा नेत्यांनी दिलेल्या आश्‍वासनांवर भूललेली आहे. त्यामुळे आता जनता पुन्हा फसणार नाही. उड्डाणपुलाचे भिजत पडलेले घोंगडे महापालिका निवडणुकीत राजकीय मुद्दा होणार आहे. हाच धागा धरत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणार आहेत. परंतु जनताही हाच मुद्दा धरून नेत्यांना जाब विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत उड्डाणाचे उड्डाण मात्र गाजणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.