ब्लॉग - पुरस्कारांची कथा अन व्यथा....

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :चांगल्या कामाची पावती देण्यासाठी काही संस्था व संघटनांनी पुरस्कार देण्याची प्रथा सुरु केलेली आहे. ही प्रथा आता सगळ्याच क्षेत्रात दृढ झालेली आहे. यामुळे कष्टकर्‍यांना न्याय मिळून ते नव्या जोमाने काम करीत होते. यामुळे कामांचा निपटाराही लवकर होत होता. तसेच अनेक कामे वेगाने होऊ लागलेली होती. परंतु आता पुरस्कारांमध्ये राजकीय वातावरण घुसलेले आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या राजकारणामुळे जे कष्ट करत नाहीत. तेच आता फळाची गोडी चाखू लागलेले आहेत. हे उघड दिसत असले तरी काही संस्था व संघटना आपला उदोउदो व्हावा, म्हणून कामचुकारांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करीत आहेत. ही प्रथा आता चांगलीच दृढ झालेली आहे. आदर्श नावाने पुरस्कार दिले जात होते. परंतु आदर्श घोटाळा उघड झाल्यामुळे पुरस्कारासमोरील आदर्श शब्द आता काढून टाकण्यात आलेला असला तरी अनेक संस्था या आदर्शचा वापर करून पुरस्कारांचे वितरण केले जात आहे. 

पुरस्कार देणार्‍या संस्था व संघटनांनी पुरस्कार देताना आपण कोणाची निवड करतोय, त्याचा कार्यकाळ कसा आहेत, त्याने केलेली कामे याचा विचार करणे गरजेचे आहे. परंतु तसे आपल्याकडे होत नाही. नावासाठी व फायद्यासाठी आता पुरस्कारांचे वितरण केले जात आहे. काहींनी पुरस्कार मिळविण्याचे विक्रमच केलेले आहे. महिना, दोन महिन्यातून पुरस्कार दिले जात आहे. त्यामुळे पुरस्कार या शब्दाचा आता अर्थ बदलून जात आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
चांगल्या माणसाला चांगल्या कामाची मिळणारी कौतुकाची थाप काही लाचारांमुळे बंद झालेली आहे. विशेष म्हणजे पुरस्कार वितरणाचे सोहळे दुसर्‍या लग्नात आपले मुंज उरकल्या सारखे केले जात आहे.हे कोठे तरी आता थांबले पाहिजे. चांगल्यांना उभारी द्यायची असेल तर पुरस्कार देतानाची लाचारी व नियमावली थांबली पाहिजे. तरच असे पुरस्कारांना महत्व राहणार आहे. नाही तर रद्दीच्या भावात पुरस्कार विकत मिळतात, अशी संकल्पना माणसा-माणसांचे मनात रुढ झाल्याशिवाय राहणार नाही. मग गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या पुरस्कारांचे महत्व नाहीसे होणार आहे. 

काही संस्था दरवर्षीच पुरस्कार देत आहेत. परंतु गल्लीतील लोकांना सोडून दिल्लीतील लोकांची माहिती घेऊन त्यांना पुरस्कार देत आहेत. यात बदल होणे गरजेचे आहे. जिथ पिकतं तिथं विकत नाही, या म्हणीचाच प्रत्यय काही पुरस्कार सोहळ्यांवरून येत आहे. ही पुरस्कार वितरणात आलेली विकृती कोठे तरी थांबली पाहिजे. 

यासाठी समाजानेच लढा उभारण्याची गरज आहे. जो कष्ट करतो, त्यांना फळ मिळू द्यायला पाहिजे. जे पुरस्कार देतात व ज्यांच्या हस्ते स्वीकारतो, याची सर्व माहिती घेऊन स्वीकारणे गरजेचे आहे. नाही तर पुरस्कार घेऊन बदनाम होण्यापेक्षा न घेतलेला बरा अशी म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.