ब्लॉग - श्रीगोंद्याचा 'कृषी'चा घास जामखेडने पळविला....

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदे करांच्या कृषी महाविद्यालयाचा तोंडापर्यंत आलेला घास जामखेडकरांना हिरावून नेला आहे. याचा रोष श्रीगोंदेकरांच्या मनात चांगलाच बसलेला आहे. हा रोष आज व्यक्त झालेला नसला तरी तो आगामी काळात उफाळून येण्याची शक्यता आहे. कृषी महाविद्यालयाचे रोपटे श्रीगोंद्याच्या भूमित लावण्यासाठी माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी पुढाकार घेतला होता. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या पुढाकारामुळे श्रीगोंद्यात कृषी महाविद्यालयाचे रोपट्याचे रोपन करण्याची तयारी झाली होती. यासाठी शासनदरबारी प्रस्तावही तयार करून पाचपुते यांनी दाखल केला होता. या कृषीच्या रोपट्याचे रोपन करण्याच्या दृष्टीने शासन दरबारी हालचाली सुरु झाल्या. हे सर्व सुरु असतानाच पालकमंत्री राम शिंदे यांनी आपल्या मतदार संघातील जामखेड तालुक्यातील हळगाव येथे कृषीचे रोपट्याचे रोपन करण्याच्या हालचाली सुरु केल्या. 

त्यांनी सप्टेंबर 2015 मध्ये शासनदरबारी प्रस्ताव दाखल केला. यामुळे भाजपाअंतर्गत संघर्षाची ठिणगी पडली अन् वनवा पेटला. या वनव्याची दाहकता मंत्रालयापर्यंत पोहचली. परंतु मंत्रालयातून यावर पाण्याचा शिपका देऊन तात्पुरती आग विझविण्यात आली. 

पालकमंत्री राम शिंदे यांनी सत्तेचा वापर करून कृषी महाविद्यालय मंजूर करून घेतले. ना. शिंदेनी उठविलेल्या वादळाने श्रीगोंद्यात रोपन होणारे कृषीचे रोपटे जामखेड तालुक्यातील हळगाव येथे नेले. या कृषीच्या रोपट्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आलेले आहे. 

या रोपणाच्या कार्यक्रमानंतर श्रीगोंदेकरांची मनाला जी जखम झालीय ती न भरणारी आहे. जखमेनंतर पालकमंत्र्यांमुळे झालेली जखम भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी श्रीगोंद्यातही कृषी महाविद्यालय होईल, असे आश्‍वासन देऊन मलम लावण्याचा प्रयत्न केला. 

श्रीगोंदेकरांची जखम बरी करायची असेल तर त्यावर तात्पुरता मलम लावून उपयोग होणार नाही. तर जखम बरी करणेच गरजेचे आहे. नाही तर ही जखम आगामी निवडणुकांमध्ये चिघळणार असून त्याचा फटका मात्र भाजपालाच बसणार आहे. 
    
                       

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या झोळीत भरभरून मतांचे दान दिलेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपाला दान मतदारांनी दिले. परंतु राष्ट्रवादीच्या मदतीला सगळेच धावल्याने लोकसभेत भाजपाच्या बाजूने झुकलेले दानाचे पारडे राष्ट्रवादीच्या बाजूने जास्त झुकले. याचा परिणाम कृषी महाविद्यालयाच्या श्रीगोंद्यातील कृषी महाविद्यालयाचे वृक्षारोपन होण्यावर झाला असण्याची शक्यता श्रीगोंदेकरांच्या मनात निर्माण झालेली आहे.

यामुळे पाचपुते यांना भाजपात विरोध असून त्यांचे महत्व कमी असल्याचे वादळ आता श्रीगोंद्यात उठत आहे. श्रीगोंद्यातील कृषीचे रोपटे परक्यांनी हिरवल्याने मनाला झालेली जखम बरी करण्यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार राहुल जगताप घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार यांनी या सर्वांनीच राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकवटून कृषीचे रोपटे जोपर्यंत श्रीगोंद्यात रोपन होत नाही, तोपर्यंत लढा उभारण्याची गरज आहे.

नाही तर कृषीच्या रोपट्यावरून श्रीगोंदेकरांच्या मनाला झालेली जखम मतदार मतपेटीतून सगळ्यांनाच दाखविल्याशिवाय राहणार नाही. या जखमेचे इनफेक्शन सर्वाधिक भाजपालाच होणार आहे, हे त्रिवार सत्य आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.