ब्लॉग - ना.राम शिंदे - ना.पंकजा मुंडेच्या वादाचा वणवा वाढणार कि विझणार ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वारसाहक्क व संपत्ती यावरून संघर्ष होण्याच्या घटना राजे-महाराजांपासून चालत आलेला आहे. पूर्वापारपासून चालत आलेली संपत्ती व सत्तेवरून संघर्षाची प्रथा आजही कायम आहे. तिच्यात कणभर फरक पडलेला नाही. गरिबातील गरिबापासून श्रीमंतातील अतिश्रीमंत असलेल्या कुटुंबांमध्ये असे संपत्ती व सत्तेवरून संघर्ष होत आहेत. असे प्रसंग अनेकदा घडत आहेत. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
रोज मरे त्याला कोण रडे या म्हणी प्रमाणे असे वाद कायम होत असल्यामुळे त्यांच्याकडे कोणी गांभिर्याने लक्ष देत नाही. आपसातील व घरातील वाद आहे, असे म्हणून त्याकडे समाज दुर्लक्ष करत असतो. पालकमंत्री राम शिंदे यांच्या राजकीय वाटचालीमध्ये स्व. गोपिनाथ मुंडे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे स्व. गोपिनाथ मुंड यांचे राजकीय वारस म्हणूनच ना. शिंदे यांच्याकडे पाहिले जात आहे. स्व. मुंडे यांच्या निधनानंतर ना. शिंदे यांनी ना. पंकजा मुंडे या आपल्या भगिनी आहेत. ना. शिंदे यांनी ना. मुंडे यांना साथ दिलेली आहे. 

या बहिण-भावांच्या नात्याचे उदाहरण देऊन राजकीय वर्तुळात आदर्श घ्यायला सांगितला जात होता. परंतु या नात्याला मात्र आता ग्रहण लागलेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणातील बहिण-भावातील वाद मात्र राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचाविणारा आहे. हे दोघेही बहिण भाव राजकीय सत्तेची फळे चाखत आहेत. विशेष म्हणजे दोन्हीही एकाच पक्षात असून दोन्हींनाही मंत्रीपदे मिळालेली आहेत. परंतु राज्यातील मंत्रीपद विस्ताराच्या वेळी बहिणीचे खाते काढून भावाला देण्यात आलेले आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्याने बहिण-भावांमध्ये तेढ निर्माण झालेला आहे. हा तेढ बळकट होण्यास भगवानगडावरील दसरा मेळाव्याने भर घातलेली आहे. परिणामी बहिण-भावातील वाद मिटण्याऐवजी आणखीच वाढत गेलेला आहे. हा अंतर्गत असलेला वाद आता हळूहळू चव्हाट्यावर येऊ लागलेला आहे. ना. शिंदे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये घेतलेल्या प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाला ना. पंकजा मुंडे यांना निमंत्रीत केलेले आहे.ना. शिंदे यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रणाला मान देऊन ना. मुंडे यांनीही हजेरी लावलेली आहे. 

कर्जतमध्ये झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या एकाही कार्यक्रमाला ना. मुंडे यांना बोलाविण्यात आलेले नाही की त्यांनी येण्यास नकार दिला हे गुलदस्त्यात आहे. ना. शिंदे यांच्या मतदार संघातील कार्यक्रम ना. मुंडे नाही, हे ना. मुंडे समर्थकांना खटकणारी गोष्ट ठरली. ना. मुंडे व ना. शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडलेली कायम आहे, असा ग्रह अनेकांनी करून घेतलेला आहे. या वादाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालेली आहे. 

मग विरोधकांनीही आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आलेली संधी सोडलेली नाही. बहिण-भावातील वादाच्या ठिणगीला विरोधकांनी आपल्याच खास लोकांकडून हवा दिली. त्यामुळेच बहिण-भावात नेमका वाद आहे की नाही हे कोणालाच माहित नाही. पण वादाच्या चर्चेचा वणवा मात्र चांगलाच पेटलेला आहे. हा वणवा ना. शिंदे यांना परवडणारा नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत या वणव्याची झळ ना. शिंदे यांना नाही तर भाजपालाही बसणार आहे.

 ना. शिंदे व ना. मुंडे यांच्यातील हा वाद मिटावा, अशी अपेक्षा भाजपातील ज्येष्ठांची आहे. ज्यांनी बहिणीचे खाते काढून भावाकडे दिले, त्यांनीच या वादावर पडदा टाकण्यास पुढाकार घेणे महत्वाचे आहे. नाही तर या वादाचा वणवा, असाच पेटत राहिला तर भाजपाच्या गोटात राख पडणार असून त्याचा फायदा इतरांना होऊ शकतो. ना. मुंडे व ना. शिंदे यांच्यातील वणवा आणखी पेटता रहावा, यासाठी अनेकांनी देवही पाण्यात ठेवलेले आहेत. या वणव्याचा फायदा नेमका कोणाला होणार हे आगामी काळात दिसणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.