ब्लॉग - विख-थोरात 'वॉर'

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राज्यासह देशात काँग्रेसची पिछेहाट का झाली यावर अनेकदा चर्चा झालेली आहे. मात्र त्याचे निश्‍चित उत्तर काँग्रेसच्या नेत्यांना सापडलेले नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून एकमेकांचे पाय ओढण्याचे खेळ अजूनही सुरु आहेत. याचा फटका मात्र पक्षाला बसत आहे. त्यामुळे देशात काँग्रेसचे बलाबल कमी होत चाललेले आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पक्ष बळकट करण्याचे धोरण राबविले जात आहे. परंतु त्याला नेत्यांकडून गालबोट लागत असल्याने पक्षाचे खच्चीकरण होत आहे. 


नगर जिल्ह्यात एक नंबर असलेली काँग्रेस विखे - थोरात यांच्या असेलेल्या सुंदोपसुंदीमुळे बॅकफूटवर गेली आहे. राज्यातच नाहीतर देशात विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद हा सर्वश्रूत झाला. या वादामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची पाळेमुळे कमी होतांना दिसत आहे. दोघांनाही याचा अंदाज आहे. त्यांच्यातील याच वादाचा फायदा विरोधकांना होत आहे. कधीकाळी काँग्रेची बलस्थाने असलेल्या संस्था आज विरोधकांच्या हातात गेल्या आहेत. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत विखे - थोरात वादाचीच चर्चा असून अनेकवेळा त्यांच्यात वरिष्ठांनी हस्तक्षेप केलेला आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
काँग्रेसने ना. विखे यांना विरोधीपक्ष नेतेपद देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शालीनीताई विखे पाटील यांच्या रूपाने त्यांच्याच घरात आहे. तसे काँग्रेस पक्षाकडून विखे यांना भरभरून मिळाले असले तरी ते भाजपात दाखल होणार अशी आवाई महिन्या दोन महिन्यातून उठत आहे. मात्र, विखेंबाबत अशाप्रकारच्या आवया का उठवल्या जातात ? या प्रश्‍नाची उकल अद्यापपर्यंत अनेक राजकीय धुरंधुरींना झालेली नाही. 

याउलट परिस्थिती काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची आहे. पक्षाशी एकनिष्ट व विश्‍वसनिय असल्याने त्यांचे दिल्लीतील वजन वाढतांना दिसत आहे. त्याचाच परिपाक म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना गुजरात निवडणुकीच्या काळात उमेदवार छाननी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यांनी यामध्ये उत्कृष्ट नियोजन केले. या नियोजनाचा परिणाम गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अध्यक्ष राहुल गांधी यांन दिसून आला. 

गुजरातमध्ये काँग्रेसला सत्ता मिळविण्यात यश मिळाले नसले तरी काँग्रेसच्या जागा वाढलेल्या आहेत. त्यामुळे दिल्लीकरांचा माजीमंत्री थोरातांवरील विश्‍वास वाढला आहे. यामुळे त्यांची हिमालाचल प्रदेशच्या निरीक्षकरदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. आगामी कर्नाटक व मध्यप्रदेश निवडणुकीतही त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्लीकर सोपविणार असल्याच्या चर्चा जोरात होत आहे. यात किती तथ्थ आहे, हे आगामी काळात स्पष्ट होणार असले तरी दिल्लीतील थोरातांचे वाढते वजन जिल्ह्यातील काही नेत्यांच्या डोकेदुखीत वाढ करणारी आहे. नशिबाने साथ दिली तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेसला यश मिळाले तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी थोरात यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
विखे गटाकडून दक्षिण मतदार संघातून डॉ. सुजय विखे यांनी उमेदवारी करावी, असा आग्रह धरला जात आहे. त्या दृष्टीने सुजय विखे यांनी पाऊलेही टाकलेली आहेत. त्यातच मागील महिन्यात सुजय विखे यांना आमदार शिवाजी कर्डिले यांनी भाजपात येण्याचे आमंत्रण दिलेले आहे. त्यावरून विखे भाजपात जाण्याची शक्यता असल्यामुळे थोरातांना दिल्लीकर राज्याबाहेरील निवडणुकांमध्ये अजमावून पाहत असल्याचे दिसतेय. त्यांचे काम पाहून पुढे राज्याचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्याची शक्यता आहे. 

आगामी काळात राजकीय समीकरणे कसे फिरतात, हे स्पष्ट होणार आहे. विखे-थोरात यांच्यामध्ये सध्या तरी सुप्तसंघर्ष सुरु आहे. हा संघर्ष वाढला तर तो पक्षाला परवडणारा नाही. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींकडून हा संघर्ष मिटविण्याचे काम होते की, जसे चालले तसेच चालू देतात, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. परंतु थोरात-विखे संघर्ष हा आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला परवडणारा नाही. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये समेट घडणेच पक्षाच्या दृष्टीने हितावह ठरणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.