माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडीयाचा प्रभाव -प्रा.माणिक विधाते

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश माहिती व तंत्रज्ञान सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी महेश बुचडे यांची नियुक्ती करण्यात आली. सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संदिप पवार व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या हस्ते बुचडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यावेळी विकास गवळी, कृष्णा पेटारे,सनी उल्हारे, सचिन आंबेकर,तौसिफ खान, विनीत म्हस्के, सुहास पाटोळे, साईनाथ लोखंडे, जुनेद शेख,राम पिंपळे, विशाल संत, रोहित शिंदे, अजय कळमकर, लवेश गोंधळे, अजय कळमकर आदि उपस्थित होते.


प्रा.माणिक विधाते म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडीयाचा प्रभाव वाढला आहे. पक्षाचे विविध उपक्रम, आंदोलन, ध्येय, धोरणे व सामाजिक कार्याच्या प्रचार प्रसारासाठी या सेलची महत्त्वाची भुमिका राहणार आहे. राज्यात ज्या अपेक्षेने नागरिकांनी सत्ताधार्‍यांना निवडून दिले. त्यांचे आश्‍वासन सर्व हवेत विरळे असून, त्यांच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. येत्या काळात राष्ट्रवादीला चांगले दिवस असून, राष्ट्रवादीचे विकासात्मक कार्ये सर्वसामान्यां पर्यंन्त पोहचविण्यासाठी हा सेल महत्त्वाची भुमिका पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
संदिप पवार म्हणाले की, मार्केटिंगच्या युगात सत्ताधार्‍यांनी जाहिरातबाजीच्या जोरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. मात्र या सत्ताधार्‍यांमुळे नागरिकांच्या पदरात निराशा पडली आहे. राष्ट्रवादीने केलेले कार्य या सेलच्या माध्यमातून जनमानसा पर्यंन्त जाणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करुन, त्यांनी बुचडे यांना शुभेच्छा दिल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.