ॲड.अभय आगरकर यांच्या समर्थकांना 'ना'भय!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांना प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी चांगला झटका दिला आहे. खासदार गांधी यांनी केडगाव व भिंगार शहराच्या मंडलाध्यक्षपदांच्या परस्पर केलेल्या नियुक्त्या रद्द ठरविल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. अभयतात्या आगरकर यांनी यासंदर्भात रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मुंबई येथे अहमदनगर शहराची पदाधिकाऱ्यांची निवडीवर वस्तूस्थिती मांडली होती. दानवे यांनी त्याची दखल घेत या नियुक्त रद्द करत पूर्वीच्या नियुक्त्या कायम ठेवल्या आहेत. दानवे यांच्या या कडक भूमिकेमुळे शहरातील ॲड. आगरकर यांच्या समर्थकांचा दरारा वाढला असून, अभय यांच्यामुळे आम्हाला 'ना'भय, अशी प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी शहरातील कार्यकारिणीमध्ये पदे वाटप केली आहेत. भिंगार शहर व केडगाव मंडलाच्या पूर्वीच्या अध्यक्षांना डावलून आपले समर्थकांची तेथे वर्णी लावली होती. भिंगार व केडगाव येथील पूर्वीचे मंडलाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांचे समर्थक होते. खासदार गांधी यांनी हे करताना त्यांना हटविले होते. खासदार गांधी यांच्या या निर्णयामुळे ॲड. आगरकर आणि त्यांचे समर्थक चांगलेच दुखवले होते. गांधी यांच्या या कारभारावर उघडउघड नाराजी व्यक्त होऊ लागली होती. 

काहींनी तर हा हुकूमशाहीपद्धतीचा प्रकार असल्याची टिका देखील केली. खासदार गांधी यांनी दोन ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या बदलावर न थांबता त्यांनी सावेडीतील मंडलाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्यावर देखील निशाणा ठेवला होता. येथील मंडलाध्यक्षपदावर आपल्या समर्थकांची नियुक्ती करण्याच्या हलाचली सुरू केल्या होत्या. सावेडीचे मंडलाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी याबाबत सावध भूमिका घेत ॲड. आगरकर यांच्याशी संपर्क साधत कैफियत मांडली होती. काम करत असताना देखील गांधी असा निर्णय परस्पर घेऊ शकतात, अशी भीती त्यांनी ॲड. आगरकर यांच्याजवळ बोलून दाखवली होती. .
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ॲड. आगरकर देखील गांधी यांच्या या भूमिकेवर अस्वस्थ होते. ॲड. आगरकर यांनी नाराजींची मोट बांधत थेट मुंबई गाठली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दावने यांच्यासमोर या नाराजांना उभे केले. 'पक्षाचे काम करताना यांचे कोठे चुकले, हे सांगा. एकनिष्ठपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शहर जिल्हाध्यक्षांनी परस्पर नियुक्त्या व पद बदलण्याचा घाट लावला आहे. पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना हेच फळ मिळत असले, तर सांगायचे कोणाला? कोणताही बदल करायचा ठरल्यास तुमच्या नावाचा हवाला दिला जातो. 

त्यामुळे कार्यकर्ते गप्प बसतात.' नाराजांनी देखील शहर कार्यकारिणीच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर बांध फोडून 'मोकळा श्वास' घेतला. दानवे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत खासदार गांधी यांनी नियुक्त केलेल्या मंडलाध्यक्षांना नकार देत नगर शहरातील पदे पूर्वी आहे, तसे राहतील, असे स्पष्ट केले. ॲड. अभय आगरकर यांच्याबरोबर बाळासाहेब गायकवाड, साहेबराव विधाते, महेश नामदे, मुकुंद गंध, मयूर जोशी, राजेंद्र सातपुते, बाळासाहेब पाटोळे आदींनी दानवे यांची भेट घेतली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.