रस्त्यावर मुरुम टाकून 'त्यांचा' अपयश झाकण्याचाच प्रयत्न - आ.बाळासाहेब मुरकुटे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आमदार असताना रस्त्यांचे प्रश्न न सोडवू शकलेले आता रस्त्यावर मुरून टाकून स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे. तरवडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आ. मुरकुटे त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
तरवडी येथे आ. मुरकुटे यांच्या प्रयत्नातून महादेव मंदिरासमोरील सभामंडप, तरवडी ते नांदूर शिकारी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण आणि तरवडी ते नजीक चिंचोली रस्ता डांबरी व मजबुतीकरण यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक बाळासाहेब पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सायमन भारस्कर यांनी केले. १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावातील कामे मंजूर झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. मुरकुटे यांचे आभार मानले. 

आ.मुरकुटे म्हणाले, निवडणुकीपेक्षा विकासकामांना आपले प्राधान्य आहे. तालुक्यात अनेक प्रकारची विकासकामे करणार आहे. तसेच तालुक्यातील जनतेला विविध सरकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विरोधक मात्र आपण केलेल्या विकासकामांचा अपप्रचार करतात. विरोधकांना विकासकामांपेक्षा येणाऱ्या निवडणूका जास्त महत्वाच्या वाटतात. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
निवडणुकीसाठी ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत असेही आ.मुरकुटे यांनी सांगितले.कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीश कर्डिले, शरद गरड, राजेंद्र म्हस्के, डॉ. फुलारी, दादाभाऊ वाघ, जनार्धन देवा, अशोक कुऱ्हे कारभारी क्षीरसागर, उत्तम दराडे, सोमनाथ विधाटे, शरद जाधव, बाळासाहेब क्षीरसागर, अविनाश गवळी आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.