नगराध्यक्षा अवमानप्रकरणी तिघांकडून घेतले प्रतिज्ञापत्र

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगराध्यक्षांबद्दल अपशब्द वापरलेले पत्र पाठवून अवमान केल्याप्रकरणी तिघांना शहर पोलिसांनी अटक केली. येथून जामिन मिळाल्यानंतर तिघांनाही अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज (दि. ८) ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून प्रतिज्ञापत्र लिहून घेत सायंकाळी सोडून दिले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
माजीमंत्री गोविंदराव आदिक व नगराध्यक्षा आदिक यांच्याबाबत अपशब्द वापरलेले पत्र काही नगरसेवक व काही प्रमुख नेत्यांना मिळाले. यानंतर संतप्त समर्थकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रेवती जयंत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत रवी राजेंद्र भांबारे, सिद्धार्थ गिरमे व कृष्णा पुंड या तिघांबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता.

त्यानुसार तपासी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांनी तपास करून आज तिघांना अटक केली. त्यानंतर येथील पोलीस ठाण्यातून त्यांना वैयक्तीक जामिनावर सोडून देण्यात आले. दरम्यान, तिघांच्याही घरी छापे टाकून त्यांचे जुने लिखाण जप्त करण्यात आले. शिवाय पोलीस ठाण्यातही त्यांच्या अक्षरांचे नमुने घेण्यात आले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अहमदनगर येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने तिघांनाही आज (दि. ८) ताब्यात घेण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून लिहून घेत त्यांना सोडण्यात आले. यापुढे त्यांना तारीख देण्यात येवून सुनावणीसाठी बोलविण्यात येणार आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून अंतिम प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे, अशी माहिती निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.