छेडछाडीचा गुन्हा दाखल करू नये म्हणून त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छेडछाडीने त्रस्त झालेल्या युवतीने तक्रारीसाठी पोलीस ठाणे गाठले. तेव्हा तीने तक्रार करु नये म्हणून तिला दमबाजी करत, एका प्रेमविराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शेवगाव पोलीस ठाण्यात सर्वांसमोर घडला. आता युवतीच्या छेडछाडीच्या व दमबाजी बरोबरच आत्महत्येच्या प्रयत्नाची फिर्यादही या रोडरोमिओवर शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सध्या हा प्रेमवीर रूग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना काल गुरुवार ता. ७ रोजी घडली. . या संदर्भात थोडक्यात माहिती अशी की, एका महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलीला रस्त्यात अडवून माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याबरोबर लग्न कर असे म्हणून त्या मुलाने या मुलीच्या अंगाला कवळी घालून लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केली. त्याबद्दलची तक्रार देण्यासाठी ती शेवगाव पोलीस ठाण्यात आली असता. तेथे ही त्याने तिचा पिच्छा सोडला नाही. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तक्रार दाखल करुन नये म्हणून पोलिसांवरही दबाव टाकण्याच्या उद्देशाने सर्वांसमोर माझ्या विरुध्द फिर्याद दाखल करता काय, अशी विचारणा करुन स्वत: विषारी औषध घेवून पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने रुग्णालयात हालवण्यात आले. आता त्याच्या विरुध्द युवतीच्या छेडछाडीच्या, दमबाजीच्या तक्रारीबरोबरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्या विरुध्द पो. काँ. राहूल नरवडे यांच्या फिर्यादीनुसार दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.