व्यापाऱ्याने घातला शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, जेऊर कुंभारी परिसरातील शेतकऱ्यांना एका व्यापाऱ्याने कोट्यवधींचा गंडा घातल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. मात्र अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.या व्यापाऱ्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून दोन वर्षात शिर्डी येथील रहिवासी असल्याचे सांगून माल खरेदी केला. याआधी रोख तसेच बॅँकेत चेकने चोख व्यवहार केले असल्याने शेतकऱ्यांचाही त्याच्यावर विश्वास बसला होता. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यावेळी मात्र या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून चढ्या भावाने सोयाबीन, मका, कांदा व डाळिंब आदी माल खरेदी केला. त्यानंतर आर.टी.जी.एस. करून थेट खात्यात पैसे जमा करतो, असे सांगितले. मात्र १५ दिवस झाले, तरी पैसे जमा झाले नाही. त्यानंतर व्यापाऱ्याचा फोन बंद झाला. एकदा फोन लागल्यानंतर मी पंढरपूर परिसरात असल्याचे त्याने सांगितले. काही जणांनी थेट पंढरपूर गाठले, मात्र तो सापडला नाही. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर काहींनी पोलीस ठाण्यात संपर्क केला. मात्र व्यापारी येईल व आपले पैसे देईल, या आशेवर फिर्याद देण्यात आली नाही. येथील शेतकरी व्यापाऱ्याच्या गोड बोलण्याला भुलले असल्याची चर्चा सध्या परिसरात व सोशल मिडीयावर सुरू आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.