साखर कारखानदारीवर बबनदादांनी बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आम्ही वाळू चोरतो, शेतकऱ्यांचे उसाचे पैसे न देता कायदा मोडतो. या आरोळ्या म्हणजे त्यांची बौध्दिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याची टीका आमदार राहुल जगताप यांनी माजी मंत्री पाचपुते यांच्यावर प्रसिद्धीपत्रकाव्दारे केली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
ज्यांनी आयुष्यभर वाळू चोरुन राजकारण केले, वाळू चोरांकडून टक्केवारी घेतली ते आमच्यावर खोटे आरोप करतात. ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडवून तळतळाट घेतला ते कायद्याच्या गोष्टी करीत आहेत. तालुक्याचा सुरु असणारा विकास त्यांना सहन होत नसल्याने त्यांचा तिळपापड होत आहे. आता मी जे कामे करतोय ते कामी मीच केली असे पाचपुते सांगत सुटले आहेत. त्यांना ३५ वर्षे कामे करण्यास कोणी अडवले होते का? असा सवाल केला.

खरतर टीका करण्यापेक्षा काम करणे हा माझा स्वभाव आहे. लोकांनी विश्वासाने मला निवडून दिले आहे. त्यांच्याच जीवावर दिवस रात्र काम करत आहे. फक्त तालुक्याचा विकास हेच माझे ध्येय आहे. परंतु काही लोक यामध्ये अडथळा आणत आहेत. मला जनतेने आमदार केले आहे. नगर व श्रीगोंदा तालुक्याचे रक्षण करणे हे माझे कर्तव्यच आहे व ते मी करतो आहे. 

तालुक्यासाठी कोणतेही भरीव विकास काम करता आले नाही. हे फक्त त्यांच्या मनातच विकास कामाचे पाठपुरावे करत राहिले. मी विरोधी पक्षातला साधा आमदार असून ऐवढी विकास कामे करतो, म्हणून त्यांचा पोटशूळ उठतो. पाचपुते ३५ वर्षे सत्तेतील आमदार, कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री असतानाही विकास कामे करता आले नाहीत फक्त सत्तेचा वापर स्वत:च्या विकासासाठी खर्ची केला.अशी घणाघाती टीका केली आहे. 

मी चाळीस गाड्या फक्त वाळू वाहतूकीसाठी घेतल्या आहेत. असे वक्तव्य करणे म्हणजे फार मोठा विनोद करण्यासारखे आहे. ज्यांच संपूर्ण आयुष्य वाळू चोरण्यात गेले ठेकेदारी करण्यात गेले ते टीका करत आहेत. ठेकेदारांच्या जीवावरच आजपर्यंत पाचपुते कुटूंबाच्या चुली चालू होत्या. सत्ता होती तोपर्यंत डेअरी दोन साखर कारखाने, परिक्रमा, हजारो एकर जमीन, शिरुर एमआयडीसी मधील १२० एकर जमीन, कोट्यवधींची माया जमा केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

सत्तेच्या काळात घरातून सोन्याचा धूर निघत होता. परंतु सत्ता जाताच हे सर्व बंद झाले. आदिवासी मंत्री असताना संगणक खरेदी, ब्लॅंकेट खरेदी केले त्याचे ठेकेदार कोण होते ? किती कोटीचा भ्रष्टाचार केला हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. स्वत:च्या खाजगी संस्थेस कोट्यवधीची वाळू कोठून आणली ? तुमच्या बगलबच्च्यांच्या वाळू उपशापायी काष्टी-तांदळीचा पूल पडायला लागला आहे. तालुक्यातील वाळू उपसा पूर्णपणे बंद करणार आहे. त्याची सुरूवात काष्टीतूनच करणार. असेही त्यांनी नमूद केले आहे.

 बबनदादांनी बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा !
साखर कारखानदारीवर बबनदादांनी बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आम्हाला कायदा शिकवणाऱ्यांनी कायदा पाळला का? ज्यांनी दिवसा ढवळया शेतकऱ्यांवर दरोडे घातले ते आम्हांला कायदा सांगत आहे.१५ दिवस पेमेंट देण्यास उशीर झाल्यावर गुन्हे दाखल करा म्हणतात. हिरडगाव कारखान्याचे ३ वर्षापासून शेतकरी, वाहतूकदार तोडणी कामगारांना एकही रूपया दिला नाही. कोट्यावधी रुपये बुडवले. मग यांना तर जन्मठेपच व्हायला पाहिजे. कुकडी व श्रीगोंदा साखर कारखान्याने कुणाचाही एक रूपया सुद्धा कधी बुडविला नाही व भविष्यातही बुडविणार नाहीत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.