शिक्षिकेचा वाढदिवस वृद्धाश्रमात; न्यू आर्ट्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद उपक्रम.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आपल्या शिक्षिकेचा वाढदिवस वृद्धाश्रमात स्वच्छता मोहीम राबवत आणि वृक्षारोपण करत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेबद्दलचा आदर व्यक्त केला आहे. न्यू आर्ट्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.भारती दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त, मातोश्री वृद्धाश्रमात येथे अहमदनगर शहरातील स्वयंभू युवा प्रतिष्ठान आणि न्यू आर्ट्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम राबवला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
वर्गमित्रांनी सामाजिक जाणीव ठेवत स्थापन केलेले स्वयंभू युवा प्रतिष्ठान आणि न्यू आर्ट्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपल्या मातोश्री समान प्राध्यापिकेचा वाढदिवस विळद घाटातील मातोश्री वृद्धाश्रमात स्वच्छता मोहीम राबवत आणि वृक्षारोपण करत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला .या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.बॅनरबाजीच्या युगात असे उपक्रम नक्कीच कौतुकास पात्र ठरतात.

स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका व न्यू आर्ट्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.भारती दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात स्वछता व वृक्षारोपण हा अनोखा उपक्रम प्रतिष्टानमार्फत राबवण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी व प्रा.मच्छिंद्र म्हस्के उपस्थित होते .मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दीपक चोरडिया,नेप्ती येथील उत्कर्ष बालघर चे सदस्य,माय टिफिन चे संचालक यांनी या उपक्रमासाठी स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांना सहकार्य केले.


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

सामाजिक कार्यासाठीच या स्वयंभू युवा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रतिष्ठानने यापूर्वीही नात रक्ताचं या उपक्रमाअंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबीर घेतले होते. या शिबिरात ५५ पिशव्या रक्त संकलित झाले होते.त्यानंतर नेप्ती येथील उत्कर्ष बालघर येथे अनाथ बालकांना खाऊ व उपयुक्त साहित्य वाटप केले होते.तसेच नुकताच आपल्या मातोश्री समान प्राध्यापिकेचा वाढदिवस विळद घाटातील मातोश्री वृद्धाश्रमात निराधार वृद्धांसमवेत साजरा करत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले,परिसरात स्वच्छता केली व वृक्षारोपणही केले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.