'त्यांना' विकासकामांपेक्षा ठेकेदारीत जास्त ' इंटरेस्ट ' - माजी मंत्री पाचपुते.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तालुक्यासाठी ५० खाटांचे अद्ययावत ३ मजली जिल्हा उपरुग्णालयास मंजुरी मिळाली. या कामासाठी मी पालकमंत्री होतो, तेव्हापासून पाठपुरावा केला आहे. रुग्णालयाला मिळालेल्या मंजुरीचे दुसऱ्यांनी श्रेय घेऊ नये. असे म्हणत विकासकामे करण्यापेक्षा कामांची ठेकेदारी मिळविण्यात 'त्यांना' जास्त इंटरेस्ट असल्याची टीका माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आमदार राहुल जगताप यांचा नामोल्लेख टाळत केली. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष मनोहर पोटे, मिलिंद दरेकर, संदीप नागवडे आदी उपस्थित होते. माजी मंत्री पाचपुते म्हणाले, मी पालकमंत्री असल्यापासून श्रीगोंद्यात अद्ययावत जिल्हा उपरुग्णालय होण्यासाठी पाठपुरावा करीत आलो आहे. आता देखील माझा याबाबत आरोग्यमंत्र्याकडे पाठपुरावा सुरूच होता. 

श्रीगोंदा शहरातील जुने बांधकाम पाडून त्याच जागी नवी इमारत उभारण्याबाबत चर्चा झाली होती. तरी आपल्यामुळे तालुक्याला जिल्हा उपरुग्णालय मिळाल्याचे कोणीही श्रेय लाटू नये. आम्ही तालुक्यासह श्रीगोंदा शहराला स्वतंत्र आरोग्य केंद्राची मागणी केली असून, त्याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. श्रीगोंदा शहरासाठी ७ कोटी ५० लाख खर्चून स्वतंत्र वीज उपकेंद्र देखील मंजूर झाल्याचही ते म्हणाले.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तालुक्यातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ६ वीज उपकेंद्र मंजूर करून आणली. काही सुरु झाली असून उर्वरित लवकरच सुरु होतील. श्रीगोंद्यासह कोळगाव, देवदैठण आणि काष्टी येथे प्रत्येकी ५० खाटांची आमची मागणी आहे. श्रीगोंदा ते टाकळी कडेवळीत या रस्त्यासाठी ६ कोटी ७० रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. हिंगणी येथे बंधाऱ्याच्या कामासाठी गेली सात वर्षे पाठपुरावा करीत होतो. अखेर राज्यपालांची विशेष परवानगी घेऊन बंधाऱ्याला मंजुरी मिळविली. तालुक्यात अरण्याच्या ठिकाणी इको सेन्सेटिव्ह झोन होणे गरजेचे असल्याचे पाचपुते म्हणाले.

तालुक्यात सुरु असलेल्या अवैध वाळूतस्करी बाबत विचारले असता, माजी मंत्री पाचपुते म्हणाले, श्रीगोंदा तालुक्यात ज्यांच्यावर रक्षणाची जबाबदारी आहे तेच चुकीचे वागत आहेत. दररोज पुण्याला अवैधरित्या वाळूवाहतूक करणाऱ्या श्रीगोंद्यातील 'त्या' चाळीस ट्रक नक्की कोणाच्या आहेत? असा सवाल उपस्थित करीत पाचपुते यांनी अवैध वाळूतस्करीत विद्यमान लोकप्रतिनिधींचा हात असल्याचा अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.